अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- सध्या देशातील विविध ठिकाणी रोज महिलांवर अत्याचार होत असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र आता तर मुलांवर देखील अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत.

जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका साडेसात वर्षीय अल्पवयीन मुलावर शाळेच्या आवारातच दुसऱ्या एका १६ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील पठार भागात समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बोळीमध्ये हे मुले खेळत होते. त्या वेळी तेथे आलेल्या सोळा वर्षाच्या मुलाने त्याला काठीने मारहाण करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.

यासंदर्भात अत्याचारित बालकाच्या आई-वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. अत्याचारित बालकाच्या आईच्या तक्रारीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला

असून अल्पवयीन आरोपी फरार झाला आहे. संगमनेर तालुक्यातील या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.