अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहे. नुकतेच राहाता तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

चाकूचा धाक दाखवून पैश्याची मागणी करणार्‍या एका व्यक्तीला राहाता पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सागर फिलीप निकाळे याने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी ढब्या उर्फ आकाश बाळासाहेब गायकवाड याला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फियादीने एके दिवशी मी व माझी पत्नी वैशाली तसेच माझी मुलगी आम्ही तिघे दुचाकी वाहनावर राहाता शहरात कपडे खरेदी करून घरी जात असताना गौतम नगर येथे आरोपी ढब्या हा आमच्या मोटारसायकलला आडवा आला.

तो मला म्हणाला की मला दारू पिण्यासाठी पैसे दे, तेव्हा मी त्याला पैसे नाही असे सांगितले. त्याचा त्याला राग आला व तो मला शिवीगाळ करू लागला तसेच त्याने माझी पत्नी वैशाली हिला सुद्धा शिवीगाळ केली.

तसेच त्याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून मला दाखविला व म्हणाला की तू जर मला पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही… असे म्हणून माझ्या खिशात हात घालून माझ्या जवळ असलेले 500 रुपये काढून घेतले.

याप्रकरानंतर आरोपीला घरी समजावून सांगण्यास गेले असता त्याने आम्हाला शिवीगाळ केली तसेच त्याच्याकडील असलेल्या चाकूने आम्हाला धाक दाखविला.

आम्ही पोलिसांना याबाबत कळविले असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन ढब्या यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सागर फिलीप निकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून ढब्या गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.