मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या बीड (Beed) दौऱ्यावर असून त्यांनी मराठवाडा माझी सासरवाडी आहे म्हणत भाषणामध्ये मिश्कील टिपण्णी केली आहे, तसेच त्याच्या या बोलण्याचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अजित पवार हे बीडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते, ते म्हणाले, यावेळी अजित पवारांनी मराठवाडा (Marathwada) आपली सासरवाडी असल्याने मास्क (Mask) काढावाच लागेल, अशी मिश्कील टिपण्णी केली आहे.

यानंतर अजित पवारांनी संपूर्ण भाषण मास्कशिवाय केले आहे. मात्र अजित पवारांच्या टिपण्णीवर कार्यक्रमात एकच हास्यमय वातावरण निर्माण झाले. दरम्यान, नेहमी मास्कमध्ये असलेले अजित पवार विना मास्क भाषण करताना पाहून सर्वजण चकीत झालेले पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने ३१ मार्चपासून राज्यातील सर्व कोरोना (Corona) निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्र (Maharashatra) मास्कमुक्त झाला आहे. परंतू, अजित पवार आजही मास्क वापरताना दिसतात.

कुठल्याही कार्यक्रमात ते मास्कचा नियम मोडत नाहीत. तसेच काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मास्क ऐच्छिक केला असला तरी पण आपण काळजी घेऊन मास्क घातला पाहिजे आणि खबरदारी घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले होते.