file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- भारत देशात मोदी सरकार आल्यापासून खऱ्या अर्थाने सुर्योदय झाला. खरा सहकार जगण्याचे व वाढवण्याचे काम मोदी करत आहेत.

जे सहकाराचे कैवारी म्हणून मिरवत होते, त्यांनीच महाराष्ट्रातून सहकार संपवण्याचे करस्थान लावले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक खासगी साखर कारखाने काढून सहकारात जाचक अटी,

अनेक कायदे व चुकीचे निर्णय घेतले त्यांनी उगाच बेकडी स्वरूप घेऊन शेतकरी व कारखान्यांना दिशाहीन करू नये, असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांनी केले.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचा ५९ वा गळीत हंगाम मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवगे, संचालक संजय होन, लता होन यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला.

अध्यक्षस्थानी स्नेहलता कोल्हे होत्या. यावेळी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवगे, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, ज्ञानेश्वर परजणे, फकिरराव बोरनारे,

भास्कर भिंगारे, अरूण येवले, अशोक औताडे, सोपान पानगव्हाणे, राजेंद्र कोळपे, शिवाजी वक्ते, विलासराव वाबळे, मनेष गाडे, प्रदीप नवले, सोनुबाई भाकरे, संगिता नरोडे, मच्छिंद्र लोणारी, वेणुनाथ बोळीज, शिवाजी दिवटे, मुख्य अभियंता के. शक्य, विवेक शुक्ला,

विश्वास महाले, साईनाथ रोहमारे, त्रबंक सरोदे, कामगार नेते मनोहर शिंदे, केशव भवर, गंगा चौधरी, शिवाजी लहारे, शरद चोरात, साहेबराव रोहोम, अरिफ कुरेशी,

मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर, महावीर दगडे, नरेंद्र डंबीर, राजेंद्र सोनवणे, स्वप्नील निखाडे, ब संभाजी रक्ताटे, रिपाईचे दीपक गायकवाड, विजय वाजे, विनोद राक्षे उपस्थित होते.