Smartphone : Realme ने आपला स्मार्टफोन Narzo 50A प्राइम भारतात एप्रिल महिन्यात लॉन्च (Launch) केला आहे. स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा IPS LCD आहे. स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून Unisoc T612 SoC वापरण्यात आला आहे.

कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 4GB रॅमसह 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो. आता रियलमी कंपनी एक नवीन स्मार्टफोन Realme C30 उद्या म्हणजेच २० जून रोजी लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे त्यांच्या भारतीय वापरकर्त्यांना आनंद होईल.

कंपनीच्या मते, हा स्मार्टफोन 20 जून रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता लॉन्च केला जाईल. GSMArena च्या मते, Realme C30 किमान दोन रंगांमध्ये येणार आहे.

म्हणजे स्मार्टफोन निळ्या आणि हिरव्या रंगात (blue and green) खरेदी करता येईल. लीकने हे देखील उघड केले आहे की C30 मध्ये Unisoc T612 SoC प्रोसेसर म्हणून वापरला गेला आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Realme ने असेही म्हटले आहे की C30 ची जाडी 8.5mm आणि वजन 182 ग्रॅम असेल. Realme C30 मध्ये तळाशी एक मायक्रो USB पोर्ट आहे, जो 3.5mm हेडफोन जॅक, मायक्रोफोन आणि स्पीकरशी (headphone jack, microphone and speakers) जोडलेला आहे.

स्मार्टफोनच्या पूर्वी लीक झालेल्या फोटोंनुसार, स्मार्टफोनमधील फोटोग्राफीसाठी, मागील कॅमेरामध्ये सिंगल कॅमेरा १३ मेगापिक्सेल सेंसर दिला जाऊ शकतो. तर सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Narzo 50A प्राइमची वैशिष्ट्ये (Features)

Narzo 50A Prime मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे.