'So many' applications for 21 posts of Shikshak Bank
'So many' applications for 21 posts of Shikshak Bank

Shikshak Bank: नुकताच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुका (Ahmednagar District Primary Teachers Bank Elections) जाहीर झाले आहे. या निवडणुकीचा निकाल (Election results) २५ जुलै रोजी लागणार आहे. मात्र यापूर्वीच जिल्ह्याचा तापमान चांगलाच वाढला आहे.

जिल्हा शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी तब्बल ८६२ अर्ज दाखल झाल्याने जिल्हयाच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत ११ जुलैला माघार घेतल्यानंतर कोण कोणाला टक्कर देणार हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. 

 सध्या शिक्षक बँकेच्या सत्तेसाठी अनेकांची धावपड सुरु आहे. आतापर्यंत अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहे. त्यामुळे आता अर्ज मागे घेण्यासाठी  पॅनलमधील उमेदवारांच्या चकरा संबंधितांच्या घरी सुरू झाले आहे.  दरम्यान, बँकेच्या या निवडणुकीसाठी प्रमुख तीन मंडळे पॅनल बनवीत आहेत.

याव्यतिरिक्त अनेक मंडळांनी सवता सुभा केला आहे. ऐन वेळी कोण कोणाला पाठिंबा देतात, याबाबत खलबते सुरू आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांच्या चुका दाखविण्याचा सपाटा लावला जात आहे.

एकूण आलेले अर्ज

सर्वसाधारण – संगमनेर ४६, नगर ४१, पारनेर ४२, कोपरगाव २५, राहाता २८, श्रीरामपूर ३७, जामखेड ४०, पाथर्डी ४३, राहुरी २६, शेवगाव २५, श्रीगोंदे ४१, अकोले २७, नेवासे ४१, कर्जत ३१, नगरपालिका, कँटोन्मेंट ३६, अनुसूचित जाती-जमाती ६५, महिला राखीव १०३, इतर मागास प्रवर्ग ९०, विमुक्त जाती, भटक्या जमाती. विशेष मागास प्रवर्ग ६५, एकूण ८६२.

अशा आहेत जागा

१६ सर्वसाधारण जागा

१ अनुसूचित जाती जमातींचे प्रतिनिधी

२ महिला प्रतिनिधी

१ इतर मागासवर्गीय प्रतिनिधी

१ भटक्या-विमुक्त जाती-जमातींचा प्रतिनिधी

२१ एकूण जागा

निवडणूक कार्यक्रम

२४ जून – अर्जांची छाननी

२७ जून ते ११ जुलै – माघार घेणे

१२ जुलै – चिन्हवाटप

२४ जुलै – मतदान

२५ जुलै – मतमोजणी