file photo

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- राज्यात आज 2844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 029 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 65 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे. राज्यात आज 60 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

राज्यात सध्या 37 हजार 794 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,54,985 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,514 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 84, 29, 804 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,44, 606 (11.2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

गेल्या 24 तासात देशात 18 हजार 795 रुग्णांची भर पडली असून 179 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात देशात 26 हजार 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत.