अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- आजकाल तरुणाईचा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. कधी कधी याचा अतिरिक्त गैरवापर देखील तुमहाला चांगलाच अडचणीत आणू शकतो याचा अनुभव संगमनेरातील एका युवा संघटनेच्या अध्यक्षाला आला आहे.

संगमनेरात फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट टाकल्याने येथील एका युवा संघटनेच्या अध्यक्षाला जमावाने बेदम चोप दिला. दरम्यान या पदाधिकार्‍याने माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील एका राजकीय पक्षाच्या युवा शाखेचा अध्यक्ष असलेल्या या पदाधिकार्‍याने यापूर्वीही फेसबुकवर अनेकदा अशा पोस्ट टाकल्या होत्या.

कालही त्याने अशीच एक पोस्ट फेसबुकवर टाकली. एका व्यक्तीपासून सावध रहा, तो लहान मुलांना दारू, सिगारेट यांचे व्यसन लावतो, असा आरोप त्याने या पोस्टद्वारे केला होता.

ही माहिती संबंधित व्यक्तीला समजताच त्याने संताप व्यक्त केला. संबंधित व्यक्तीने पोस्ट करणाऱ्या पदाधिकार्‍याचा शोध घेतला.

या पदाधिकार्‍याने दादागिरीची भाषा वापरल्याने संतप्त झालेल्या या इसमाने त्याला रंगारगल्ली परिसरात बेदम चोप दिला. यानंतर संबंधित व्यक्ती शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी त्याने संबंधित व्यक्तीची नंतर फेसबुकवरूनच माफी मागितली.