मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोपांचा अंक काही नवा नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोपसत्र सुरु आहे.

संजय राऊत यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) गोळा केलेल्या निधीत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neel Somaiya) या दोघांनी घोटळा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या आहेत.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) किरीट सोमय्या यांना समन्स बजावल्यानंतर त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल लागत आहे. यावरूनच संजय राऊत हे किरीट सोमय्या यांच्यावर तुटून पडल्याचे दिसत आहेत.

संजय राऊत यांनी सोमय्या देश सोडून पळून जाऊ शकतात असे म्हणत सोमय्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ते अशी एकही संधी सोडत नाहीत की किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधण्याची.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, किरीट सोमय्या 140 कोटी रुपये जमा करून राजभवनात देणार होते. त्यांना 58 कोटी जमवता आले. Ins vikrant 60 कोटी ना भंगारात गेली.

58 कोटीचा हिशेब लागत नाही. जे सोमय्या बाप बेट्याने जमा केले. हिशोब तर द्यावाच लागेल. 58 कोटी हडप केले नसते तर विक्रांत वाचवता आली असती. जय महाराष्ट्र! असे ट्विट करत सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले आहेत की, भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सोमय्यांचा समाचार घेतला आहे.

जर तुम्ही गुन्हा केला नाही म्हणता, घाबरत नाही म्हणता, इतरांना त्याच्या भ्रष्टाचारावरून प्रश्न विचारता, कायद्याला कोर्टाला सामोरे जा म्हणता मग तुम्ही का पळता? असे प्रश्न संजय राऊत यांनी सोमय्यांना विचारले आहेत.