file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील एक ४८ वर्षीय महिला जेवनाचा डबा घेऊन पायी चालत होती. तेव्हा सुरेश झारेकर हा तिच्या पाठीमागून आला.

त्याने पाठीमागून मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना राहुरी तालूक्यात दिनांक ७ जानेवारी रोजी घडलीय.

सदर ४८ वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान सदर महिला ही तिच्या मुलाचा जेवनाचा डबा घेऊन त्यांच्या किराणा दुकानाकडे जात होती.

यावेळी तिच्या घरासमोर सुरेश झारेकर हा तिच्या पाठीमागून आला. त्याने त्या महिलेला पाठीमागून मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच शिवीगाळ केली.

तू आता माझ्या तावडीतून वाचलीस. पूढच्या वेळेस तूझा बेतच पाहतो. अशी धमकी दिली. त्यावेळी तिन आरोपींनी मिळून त्या महिलेला लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.

त्या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश भास्कर झारेकर, भास्कर सयाजी झारेकर व संगिता सुरेश झारेकर या तिघांवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक अमित राठोड हे करीत आहेत.