अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक कोपरगावचे युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांना कोरोनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या आरोग्यासाठी कोळपेवाडीवासियांनी जागृत देवस्थान महेश्वर महाराज यांच्याकडे साकडे घातले आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन निवृत्ती कोळपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरती करून कोल्हे यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली .

प्रारंभी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक राजेंद्र निवृत्ती कोळपे यांनी प्रास्ताविक केले . जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर त्यांनी समाज माध्यमावर त्याबाबत माहिती देत आवश्यक त्या चाचण्या करून घेतल्या आजवरच्या प्रत्येक संकटात त्यांच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगाव मतदार संघाबरोबरच अन्य आपत्तीग्रस्तांना मोलाची मदत केली.

कोरोनाग्रस्तावर संजीवनी कोडी सेंटरच्या माध्यमातून मोफत उपचारही केलेले आहे त्या जाणिवेतून युवा नेतृत्वावर आलेले संकट हरण व्हावे अशी प्रार्थना महेश्वर महाराज चरणी करण्यात आली.

याप्रसंगी सर्वश्री भाऊसाहेब कोळपे, सुखदेव कोळपे, राजेंद्र देशमुख, लकडे अण्णा, विजय कोळपे, रामनाथ कोळपे, कचरू ढोणे, भिकणराव कोळपे, शब्बिर भाई, सूर्यभान कोळपे, कारभारी कोळपे,

संजय कोळपे, निवृत्ती कोळपे, किरण कोळपे, दादा शिंदे, सचिन हाळनोर, प्रकाश जुंधारे, दिपक ढोणे, दत्तु कोळपे, अर्जुन कोळपे, अरुण कोळपे, प्रभाकर कोळपे, निकेश कोळपे, सागर कोळपे, रोहीत कोळपे, व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.