अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- दीड महिन्यापूर्वी सोयाबीन पिकाचे व 10 हजार रुपये क्विंटलपर्यंत वाढले होते. सुरुवातील सोंगणीचा दर सहा हजार रुपये प्रति एकर होता.

मात्र परिसरातील काही शेतकर्‍यांनी परराज्यातील मजुरांच्या टोळ्या आणल्यामुळे सोंगणीचा दर चार ते साडेचार हजार रुपये एकरापर्यंत स्थिरावला आहे. दरम्यान सध्या सोयाबीन पिकाची सोंगणी व काढणीची कामे वेगाने सुरु आहे. आधीच अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

सरासरी उत्पादन 10 क्विंटल प्रति एकर पेक्षाही कमी होऊ लागले आहे. तसेच सध्या व्यापारी वर्गाकडून सोयाबीनची खरेदी, मालाची गुणवत्ता बघून चार ते साडेचार हजार प्रति क्विंटलने खरेदी केली जाते.

उत्कृष्ट मालाला पाच हजारापर्यंत दर दिले जात आहे. दिवाळी सारखा सण काही दिवसावर आल्यामुळे शेतकरी वर्ग मिळेल त्या भावाने सोयाबीनची विक्री करत आहे.

खरीपाची पिके काढल्यानंतर रब्बी हंगामाची तयारी काही शेतकरी वर्गानी सुरु केली आहे. परिसरात समाधानकारक पाऊस पडलेला आहे. त्यामुळे रब्बी पिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही.