अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- राहाता बाजार समितीत काल शुक्रवारी लाल आणि उन्हाळ या दोन्ही कांद्याच्या ४०१२ गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त ३२०० तर लाल कांद्याला ३००० रुपये इतका भाव मिळाला.

सोयाबीनला जास्तीत जास्त ६५१४ रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत ४ हजार १२ कांदा गोण्यांची आवक झाली. उन्हाळ कांदा नंबर १ ला २७०० ते ३२०० रुपये तर लाल कांद्याला २५०० ते ३००० असा भाव मिळाला.

कांदा उन्हाळी नंबर २ ला १८५० ते २६५० रुपये, लाल कांद्याला १६५० ते २४५० रुपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला उन्हाळी ७०० ते १८०० रुपये तर लाल कांद्याला ६०० ते १६०० भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला १९०० ते २१०० रुपये व लाल कांद्याला १८०० ते २००० रुपये भाव मिळाला.

जोड कांद्याला १०० ते ६०० रुपये व लाल कांद्याला १०० ते ५०० रुपये भाव मिळाला. सोयाबीनची २७ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी ६२९२ ते जास्तीत जास्त ६५१४ रुपये भाव मिळाला.

सरासरी ६४०० असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला १४२५ रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. तर चिकूच्या ४७ क्रेट्सची आवक झाली. चिकूला कमीत कमी एका क्विंटलला १००० तर जास्तीत जास्त २२५० रुपये व सरासरी १५०० रुपये असा भाव मिळाला,