संरक्षण आणि निमलष्करी दलांमध्ये नोकरीसाठी अनेक तरुण मोठ्या प्रमाणावर कष्ट घेत असतात व भरतीची तयारी करत असतात. कारण शहरी भागापेक्षा सध्या ग्रामीण भागातील तरुणांची सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची प्रचंड प्रमाणात इच्छा असून अनेक तरुण मोठ्या प्रमाणावर कष्ट घेत आहेत.
संरक्षण क्षेत्रातील विविध पदांवर भरती होणे हे बऱ्याच तरुणांचे स्वप्न आहे व या दृष्टिकोनातून अनेक तरुण संरक्षण क्षेत्रातील संबंधित असलेल्या नोकर भरतीची वाट पाहत असतात
. याच पद्धतीने तुम्ही देखील दहावी पास असाल व सैन्य दलात नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजेच आयटीबीपीमध्ये गट सी करीता भरती केली जाणार असून त्याची अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.
आयटीबीपी मध्ये होणार 202 पदांवर भरती
सविस्तर वृत्त असे की, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस अर्थात आयटीबीपीमध्ये तरुणाची भरती केली जाणार असून ही भरती गट सी पदांसाठी जारी करण्यात आलेली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट पासून सुरू केली गेली असून या अंतर्गत सुतार तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि गवंडी या पदांची भरती केली जाणार असून एकूण 202 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पदनिहाय रिक्त जागांची संख्या
आयटीबीपी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये कॉन्स्टेबल( सुतार) या पदाच्या एकूण 71, कॉन्स्टेबल( प्लंबर) या पदाच्या एकूण 52, कॉन्स्टेबल ( इलेक्ट्रिशियन) या पदाच्या एकूण 64 आणि कॉन्स्टेबल( गवंडी) या पदाच्या एकूण 15 जागांचा समावेश आहे. या भरतीचे एक विशेष म्हणजे या पदांवर पुरुषच नाही तर महिला देखील अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे व त्याच्याकडे संबंधित ट्रेड मधील आयटीआय प्रमाणपत्र देखील असावे. तसेच या भरती करिता आवश्यक पात्रतेशी संबंधित इतर माहितीसाठी उमेदवारांनी या भरतीची सूचना म्हणजेच नोटिफिकेशन वाचणे गरजेचे आहे.
काय आहे आवश्यक वयोमर्यादा?
आयटीबीपीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार शुभेच्छुक व पात्र असतील त्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच ओबीसी आणि एससी एसटीसह इतर आरक्षित प्रवर्गांना वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.
कशी केली जाईल उमेदवारांची निवड?
आयटीबीपी कॉन्स्टेबलच्या या भरतीमध्ये उमेदवारांची निवड करण्याकरिता शारीरिक कार्यक्षमता चाचणी तसेच पीएसटी म्हणजे शारीरिक मानक चाचणी व लेखी परीक्षा आणि त्यानंतर मेडिकल म्हणजेच वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल व त्या आधारे निवड केली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल
वेतन?आयटीबीपी कॉन्स्टेबलच्या या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना लेव्हल तीन नुसार वेतन दिले जाणार आहे. जे 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये पर्यंत असू शकते.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी recruitment.itbppolice.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करणे गरजेचे आहे.
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
आयटीबीपीमध्ये होणाऱ्या या भरतीकरिता ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते 10 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.