आपण बऱ्याचदा प्रवास करत असताना जेव्हा एखाद्या शहरात जायला निघतो तेव्हा त्या ठिकाणी रस्त्यांपेक्षा रेल्वेची कनेक्टिव्हिटी ही फायद्याची ठरते व ट्रेनने प्रवास करून आपण आपल्या इच्छित स्थळी पोहोचत असतो. परंतु अशा ठिकाणी जायला ट्रेन ऐवजी जर एखाद्या एक्सप्रेस वे किंवा हायवे असेल तर आपण रस्ते मार्गाने हा प्रवास पूर्ण करून त्या शहरात जातो.
तसे पाहायला गेले तर रस्ते मार्गाने केलेला प्रवास हा आमच्या प्रवासापेक्षा मजेशीर असतो. कारण रस्ते मार्गाने प्रवास करत असताना आपण हव्या त्या ठिकाणी थांबू शकतो आणि प्रवासाचा आनंद घेत प्रवास करू शकतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना रेल्वेच्या प्रवासापेक्षा रस्त्याच्या माध्यमातून होणारा प्रवास खूप आवडतो.
अगदी हीच परिस्थिती आता भारतात खूप लांब राहिली नसून अगदी पुढच्या वर्षी देशामध्ये अकरा एक्सप्रेस वे आणि हायवे तयार केले जात असून यामध्ये महाराष्ट्रत देखील काही हायवे तयार केली जाणार आहेत.
देशामध्ये सध्या महामार्गाची कामे सुरू असून 2023 ते 2024 मध्ये 12000 किलोमीटर हुन अधिक राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग तयार करण्यात आले आहे. देशामध्ये दररोज 33 किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार केले जात असल्याची माहिती समोर आलेली आहे.
पुढच्या वर्षी बांधण्यात येणार 5467 किमीचे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशात पुढच्या वर्षी अकरा महामार्ग आणि द्रूतगती महामार्ग बांधण्यात येणार असून त्यांची एकूण लांबी 5467 किमी असेल व हे एकूण 16 राज्यांमधून जाणार आहेत.
साहजिकच या राज्यांमधील महत्त्वाच्या शहरांमधील जी काही वाहतूक कनेक्टिव्हिटी आहे ती सुधारण्यास मदत होणार आहे. हे महामार्ग निश्चित केलेल्या वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न देखील रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
कोणते आहेत हे महामार्ग आणि किती आहे त्यांची लांबी?
या महामार्गांमध्ये सध्या सुरू असलेल्या सर्वात जास्त लांबीचा असलेला दिल्ली ते मुंबई हा 1350 किलोमीटरचा एक्सप्रेस वे, दिल्ली ते कटरा एकूण लांबी 670 किलोमीटर, रायपूर ते हैदराबाद 330 किलोमीटर, इंदोर ते हैदराबाद 713 किमी,
सुरत ते सोलापूर 464 किमी, नागपूर ते विजयवाडा 457 किमी, चेन्नई ते सालेम 277 किमी, सोलापूर ते कुणलूर 318 किमी, नागपूर ते विजयवाडा 457 किमी हैदराबाद ते विशाखापट्टणम 221 किलोमीटर या अकरा महामार्गांचा यामध्ये समावेश असणार आहे.
या यादीतील दोन एक्सप्रेस वे लवकर होतील सुरू
या अकरा द्रूतगती मार्ग आणि महामार्गांपैकी दोन द्रुतगती महामार्गांचे काम यावर्षी पूर्ण होईल. यामध्ये दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते डेहराडून या एक्सप्रेसवे चा समावेश आहे. या दोन्ही महामार्गाचे काम सध्या या एक्सप्रेस वे चे काम अनेक टप्प्यात सुरू असून त्यांचे काम पूर्ण होईल तसं तसे ते लोकांसाठी खुले केले जाणार आहेत.
यातील दिल्ली, डेहराडून बॉर्डर पर्यंत आणि दिल्ली आणि मुंबई या एक्सप्रेस वे मधील दिल्ली ते सुरत हा टप्पा यावर्षी सुरू होणार आहे.