11th Admission Maharashtra : फेब्रुवारी अन मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा देऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला असून संबंधित विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
दरम्यान निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बारावीचा निकाल हा या चालू महिन्याच्या अखेरपर्यंत आणि दहावीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे.
अशातच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, आता अकरावीच्या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यानुसार अकरावीमध्ये प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे.
पुणे, मुंबई, नासिक यांसारख्या महानगरात असलेल्या शाळांमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. 25 मे पासून ही प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी हा जोपर्यंत दहावीचा निकाल लागत नाही तोपर्यंत राहणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे व पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील महानगर पालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.यासाठी राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
यानुसार 25 मे पासून ही प्रवेश प्रक्रिया ची सुरुवात होणार आहे. ही सुधारित प्रवेश प्रक्रिया २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे (Pune News) व पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राबवली जाते.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ रेल्वे स्थानकावर देखील मिळणार थांबा, पहा….
म्हणजे या संबंधित शाळांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने अकरावीच्या वर्गात प्रवेश दिले जातात. आता 25 मे पासून पूर्वी शरीराचा पहिला भाग विद्यार्थ्यांना भरता येणार असून प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच अकरावीच्या प्रवेशासंदर्भात जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवेशाची पहिली फेरी ही निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबविली जाणार आहे.
दुसरी व तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस राबवण्यात येणार आहे. आणि विशेष प्रवेश फेरी १ सात ते आठ दिवस राबविण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे.
हे पण वाचा :- सावधान ! अवकाळी परत येतोय; ‘या’ भागात पुढील 3 दिवस कोसळणार वादळी पाऊस, तुमच्या भागात कसं राहणार हवामान?