7th Pay Commission DA Hike : तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आगामी काळात वाढणार आहे.
सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची योजना आखली आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार रुपयांवरून थेट 26000 रुपये होणार आहे.
अर्थातच या सरकारी नोकरदार मंडळीच्या पगारात बंपर वाढ नमूद होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या अनेक दिवसांपासूनची सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी सरकार लवकरच मंजुरी देऊ शकते. असे झाल्यास किमान वेतन 18,000 वरून 26,000 रुपये होणार आहे.
सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे तो 3.68 पट वाढवण्याची मागणी सरकारी कर्मचारी संघटना दीर्घ काळापासून करत असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या याच मागणीवर आता सरकार सकारात्मक निर्णय घेणार अशी बातमी आली आहे.
यासंदर्भात केंद्रातील सरकार या आठवड्यात निर्णय घेऊ शकते असे म्हटले जात आहे. जर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा केली तर त्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के पगार मिळत आहे, जर तो 3.68 टक्के केला तर कर्मचाऱ्यांचा किमान पगार 8,000 रुपयांनी वाढेल.
म्हणजेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८,००० रुपयांवरून २६,००० रुपये होणार आहे. अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 8 हजार रुपयांनी वाढणार आहे.
यामुळे वाढत्या महागाईने संकटात सापडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. तथापि या संदर्भात अजून सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
त्यामुळे सरकार या संदर्भात नेमका काय निर्णय घेणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. पण जर सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तर सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे.