7th Pay Commission DA Hike News : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला.
यानुसार या संबंधित केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% एवढा झाला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता केंद्रिय कर्मचारी आणि स्वायत्त संस्था (सार्वजनिक उपक्रम विभाग)च्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे. सरकारने पाचवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 टक्क्यांनी वाढवलाय.
तसेच सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्क्यांनी वाढवलाय. ५ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सध्याच्या ४३३ टक्क्यांवरुन ४५५ करण्यात आला आहे.
म्हणजेच महागाई भत्त्यात थेट १२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच, सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २३९ टक्क्यांवरुन २४६ टक्के करण्यात आला आहे. अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे सातवा वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने जुलै महिन्यापासून ही वाढ लागू करण्यात आली होती त्याच धर्तीवर पाचवा आणि सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली आहे.
खरंतर सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधीपासून वाढणार हा मोठा सवालक उपस्थित केला जात होता.
दरम्यान सरकारने आता पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अनुक्रमे बारा आणि सात टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.