7th Pay Commission : जर तुम्हीही केंद्रीय शासकीय सेवेत किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी म्हणून शासकीय सभेत उपस्थित असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची आणि अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. खरंतर येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होणार आहेत.
त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून कंबर कसण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट देणार असे वृत्त समोर आले आहे.
वास्तविक, सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. या संबंधित मंडळीला मागील महागाई भत्ता वाढ ऑक्टोबर 2023 मध्ये मिळाली होती.
त्यावेळी महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के एवढा झाला होता. विशेष म्हणजे ही वाढ जुलै 2023 पासून लागू झाली होती. अशातच, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
ती म्हणजे मार्च 2024 मध्ये होळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता आणखी 4 टक्क्यांनी वाढवला जाणार आहे.
अर्थातच महागाई भत्ता म्हणजेच डीए हा 50 टक्के एवढा होणार आहे. परंतु याची अंमलबजावणी जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे.
अर्थातच मार्चमध्ये जेव्हा याची घोषणा होईल तेव्हा महागाई भत्ता वाढीचा तर लाभ मिळणारच आहे, शिवाय जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील सदर नोकरदार मंडळींला दिली जाणार आहे.
यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. मात्र महागाई भत्ता जेव्हा 50% होईल तेव्हा महागाई भत्ता शून्य केला जाणार आहे.
अर्थातच त्यावेळी महागाई भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जोडली जाणार आहे. याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
परंतु मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता खरच केंद्र शासनाने याबाबत निर्णय घेणार का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.