देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी ! ऑफिशियल नोटिफिकेशन जारी

देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सरकारने शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या पेन्शन धारकांसाठी नुकतेच एक महत्त्वाचे नोटिफिकेशन जारी केले असून या नोटिफिकेशन मध्ये पेन्शन बाबत मोठा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Published on -

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना सेवाकाळात विविध लाभ मिळतात तसेच ते निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना वेगवेगळे लाभ मिळत असतात. सरकारी कर्मचाऱ्यांबाबत बोलायचं झालं तर सेवाकाळात त्यांना चांगले वेतन मिळते शिवाय वेगवेगळ्या भत्त्यांचा लाभ मिळतो.

एवढेच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतरही चांगली पेन्शन दिली जाते. यामुळे प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवीहवीशी वाटते. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शन संदर्भातच सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे पेन्शन धारकांचा मोठा फायदा होणार असून म्हणूनच या निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे. दरम्यान सरकारने जारी केलेले हे नोटिफिकेशन अनुकंपा पेन्शन संदर्भात आहे. अशा परिस्थितीत आज आपण सरकारने जारी केलेले हे नोटिफिकेशन नेमके काय सूचित करते याचा आढावा घेणार आहोत.

या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार अनुकंपा पेन्शन

केंद्रातील सरकारने अनुकंपा पेन्शन बाबत एक नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने (DoPPW) 80 वर्ष व 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शन म्हणजेच अनुकंपा पेन्शन देण्याची घोषणा केली आहे.

खरंतर अनुकंपा पेन्शन बाबत सातवा वेतन आयोगात तरतूद होती आणि याच तरतुदीनुसार आता या अनुकंपा पेन्शनच्या बाबत सरकारकडून नवे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या नव्या नोटिफिकेशन नुसार असे स्पष्ट होते की शासकीय सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्याला तो 80 वर्षाचा होईपर्यंत फक्त मूळ पेन्शन दिले जाणार आहे.

पण निवृत्त कर्मचाऱ्याने 80 वर्षाचा टप्पा ओलांडला की त्यानंतर त्याला अतिरिक्त पेन्शन म्हणजेच अनुकंपा पेन्शनचा लाभ मिळणार आहे. नक्कीच या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे या महागाईच्या काळातही त्यांना आर्थिक अडचण भासणार नाही अशी आशा आहे.

किती अतिरिक्त पेन्शन मिळणार?

अनुकंपा पेन्शन म्हणजेच सध्याच्या पेन्शन समवेतच आणखी अतिरिक्त पेन्शन देणे होय. म्हणजेच कर्मचाऱ्यांचे वय वाढले की त्यांना दिली जाणारी पेन्शनची रक्कम सुद्धा वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन धारकांचे वय 80 ते 85 वर्षे झाल्यानंतर त्यांना मूळ पेन्शनवर 20 टक्के अतिरिक्त पेन्शन मिळणार आहे.

यानंतर ही पेन्शन प्रत्येक पाच वर्षांनी दहा टक्क्यांनी वाढणार आहे. एवढेच नाही तर सेवानिवृत्त कर्मचारी शंभर वर्षांचे झाल्यानंतर त्यांना मूळ पेन्शनच्या 100% अनुकंपा पेन्शन मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!