सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! सेवानिवृत्तीचे वय थेट 62 वर्षे होणार, सरकारचा प्रस्ताव तयार, कधीपर्यंत होणार निर्णय? वाचा….

Tejas B Shelar
Published:
7th Pay Commission News

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% झाला आहे. दरम्यान आता महागाई भत्ता वाढीची भेट मिळाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या विचारात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे.

पण आता हे वय आणखी दोन वर्षांनी वाढवण्याबाबत सरकारकडून विचार सुरू झाला आहे. सेवानिवृत्तीच्या वय 60 वर्ष ऐवजी 62 वर्ष करणे बाबत महत्वपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

केंद्र शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून याबाबतचा प्रस्ताव रेडी झाला असल्याचे म्हटले जात असून या संदर्भातील निर्णय येत्या काही दिवसांनी सरकारकडून घेतला जाईल असा मोठा दावाही होऊ लागला आहे.

तथापि या संदर्भात केंद्रातील सरकारने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे खरच केंद्रातील मोदी सरकार याबाबतचा निर्णय घेणार का ही गोष्ट पाहण्यासारखे ठरणार आहे.

मात्र जर असा प्रस्ताव सरकारने तयार केलेला असेल आणि या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सदर प्रस्तावाचा फायदा केंद्र सरकारच्या अधिनस्त असणाऱ्या 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार अशी माहिती जाणकार लोकांनी दिली आहे.

खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षांवरून 62 वर्ष करावे अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून गत काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केली जात आहे.

यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू असून आता हाच पाठपुरावा यशस्वी होताना दिसतोय. याच पाठपुराव्याच्या अनुषंगाने केंद्रातील सरकारने सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षांवरून 62 वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला असल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe