7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी नोकरदार म्हणून नोकरी करत असेल तर तुम्ही आजची ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा लवकरच पगार वाढणार आहे. केंद्रातील मोदी सरकार येत्या काही दिवसात पगारवाढीची घोषणा करणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. हा भत्ता एका वर्षात दोनदा वाढवला जातो. यानुसार मार्च 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला गेला होता.
यानुसार या नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 50% झाला असून ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होणार आहे. ही या वर्षातील दुसरी वाढ राहणार आहे.
सप्टेंबर महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढवला जाण्याची शक्यता आहे. तथापि ही वाढ जुलै 2024 पासूनच लागू राहणार आहे.
यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि रिटायर्ड झालेल्या पेन्शन धारकांचा महागाई सवलत भत्ता जुलै महिन्यापासून तीन टक्क्यांनी वाढवला जाणार आहे.
अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% आणि पेन्शन धारकांचा महागाई सवलत भत्ता 53% एवढा होणार आहे. याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला जाईल. यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबतच वाढीव महागाई भत्त्याची भेट केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने या पगारासोबत महागाई भत्ता फरकाची म्हणजेच थकबाकीची रक्कम सुद्धा मिळणार आहे.
जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांची थकबाकी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. यामुळे या सरकारी नोकरदार मंडळीला दिवाळीच्या आधीच दिवाळी भेट मिळणार असे बोलले जात आहे.