स्पेशल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! नवरात्र उत्सवाच्या आधीच ‘हा’ भत्ता वाढला, पगारात होणार बंपर वाढ

Published by
Tejas B Shelar

7th Pay Commission : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सव, विजयादशमी आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दरम्यान दिवाळीपूर्वीचं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी हाती आली आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रोड मायलेज भत्ता सुधारित करण्यात आला असून त्याचा लाभ पात्र लाभार्थी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 50 टक्क्यांनी वाढ केली होती, ज्यामुळे 13 इतर भत्ते आपोआप सुधारले गेले आणि 25 टक्क्यांनी वाढले होते.

दरम्यान, आता भारतातील केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांचा ते वापरत असलेल्या वाहतूक आणि ते राहत असलेल्या शहरावर अवलंबून असणारा रोड मायलेज भत्ता (RMA) वाढवण्यात आला आहे. या भत्त्यासाठी जे कर्मचारी पात्र असतील त्यांना याचा लाभ मिळणार आहे.

खरेतर सरकारी कर्मचाऱ्यांना पदानुसार वेगवेगळे भत्ते मिळतात आणि केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्याला सर्व भत्ते मिळत नाहीत. यानुसार, आता भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसाठी रोड मायलेज भत्ता सुधारित करण्यात आला आहे.

यामुळे या सदर अधिकाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. डीए म्हणजेच महागाई भत्ता 50 % वाढवल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने आता तात्काळ प्रभावाने RMA (रोड मायलेज भत्ता) लागू करण्यास मान्यता दिली आहे. भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसाठी हा पत्ता वाढवण्यात आला आहे.

या वर्षी मार्चमध्ये जानेवारी-जून 2024 या कालावधीसाठी डीएमध्ये 50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे भत्ते वाढलेत. 4 जुलै 2024 रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ही माहिती देणारे परिपत्रक जारी केले होते.

सरकारी कर्मचाऱ्यांचे खालील भत्ते वाढलेत

-Tough Location Allowance
-Conveyance Allowance
-Special Allowance for Children of Women With Disabilities
-Children Education Allowance
-House Rent Allowance or HRA
-Hotel Accommodation
-Reimbursement of Traveling Charges for Travel Within the City
-Reimbursement of Food Charges/ Lump Sum Amount or Daily Allowance
-Dress Allowance
-Split Duty Allowance and and Deputation (Duty) Allowance

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com