स्पेशल

पुणे ते नाशिक अंतर 3 तासात होणार पार, वाचा कसा आहे या महामार्गाचा रूट ?

Published by
Ajay Patil

देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून महामार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण असते व त्यासोबतच देशातील महत्त्वाच्या शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे व प्रवासाच्या दृष्टिकोनातून असे महामार्ग खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

या दृष्टिकोनातून जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या महामार्गांचे नेटवर्क तयार केले जात असून या माध्यमातून राज्याच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राचा विकास तसेच इतर महत्त्वाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे रस्ते प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत.

अशा राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांमध्ये पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग हा एक प्रस्तावित महामार्ग असून राज्यातील पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची शहरे या महामार्गाच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाणार आहेत. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिर्डी प्रवास तीन तासात व पुणे ते नाशिक हा प्रवास देखील तीन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.

 पुणेनाशिक औद्योगिक महामार्गासाठी आठ हजार कोटींचा निधी मंजूर

पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संरेखनास मंजुरी देण्यात आलेली असून या महामार्गाकरिता 8000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणे आणि खेड दरम्यान जिथे वाहतूक कोंडी होते ती कमी होण्यास मदत होणार आहे. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या महामार्गामुळे राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि महत्त्वाचे असलेले शहर नाशिक यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार असून हा प्रवास अवघ्या तीन तासात आता पूर्ण करता येणार आहे.

इतकेच नाही तर याच महामार्गावरून राजगुरुनगर, चाकण व मंचर मार्गे थेट शिर्डीला देखील जाता येणार आहे. वास्तविक या दोन शहरात दरम्यान रेल्वे मार्गाचे काम प्रस्तावित होते.

परंतु हा प्रकल्प अधांतरी असताना नाशिक औद्योगिक महामार्गला मंजुरी देण्यात आली असून जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. जून 2023 मध्ये एमएसआरडीसीच्या माध्यमातून या औद्योगिक महामार्गाचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आलेला होता.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या औद्योगिक महामार्गाच्या प्रकल्पाला मान्यता दिली असून केंद्र सरकारने देखील याला हिरवा कंदील दाखवला आहे व या प्रकल्पाकरिता तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

 कसा असणार हा औद्योगिक महामार्ग?

नाशिक ते पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर असलेल्या नाशिक फाटा ते खेड दरम्यानच्या एका प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ही मंजुरी दिली असून या दोन्ही ठिकाणांना जोडणारा 30 किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारला जाणार आहे व या प्रकल्पासाठी सात हजार 827 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

परंतु सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाकरिता वाढीव खर्च लक्षात घेत 8000 कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा महामार्ग 213 किलोमीटर लांबीचा असणारा असून यामुळे नाशिक ते पुणे हे अंतर पाच तासाऐवजी तीन तासात पूर्ण होणार आहे. हा प्रस्तावित महामार्ग राजगुरुनगर, चाकण

तसेच मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, सिन्नर मार्गे थेट शिर्डी तीर्थक्षेत्राकडे जाणार आहे. तसेच हा महामार्ग तीन टप्प्यांमध्ये जोडला जाणार आहे व यातील पहिल्या टप्प्यात पुणे ते शिर्डी हा 135 किलोमीटरचा मार्ग दुसऱ्या टप्पा शिर्डी इंटरचेंज ते नाशिक- निफाड इंटरचेज पर्यंत साठ किलोमीटर पर्यंतचा असणार आहे.

हा टप्पा सुरत ते चेन्नई एक्सप्रेस वेला जोडला जाणारा असून या महामार्गाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा नाशिक निफाड इंटरचेंज ते नाशिक शहर असा साठ किलोमीटरचा असणार आहे.

Ajay Patil