8th Pay Commission News : 2025 च्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय सरकारी कर्मचार्यांना चांगली बातमी मिळाली आहे. खरं तर, सरकारने गुरुवारी केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाची मागणी केली जात होती. अखेर कार सरकारने ही मागणी मान्य केली आणि आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे.
दरम्यान आता आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी देण्याच्या मोठ्या निर्णयानंतर केंद्रातील सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात आता केंद्रीय कर्मचार्यांना आणखी एक भेट मिळेल अशी अपेक्षा आहे.
ही भेट म्हणजे महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे. खरं तर, केंद्र सरकार दरवर्षी सहामाही आधारावर दोनदा भत्ता वाढवते. पहिल्यांदा जानेवारी ते जून या कालावधीमधला महागाई भत्ता वाढवला जातो आणि याचा निर्णय मार्च महिन्यात होत असतो. दुसऱ्यांदा जुलै ते डिसेंबर या कालावधी मधला महागाई भत्ता वाढवला जातो आणि याचा निर्णय हा साधारणतः ऑक्टोबर महिन्यात होतो.
जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील महागाई भत्ता ऑक्टोबर 2024 मध्ये वाढवण्यात आला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली असून हा भत्ता 53% एवढा झाला आहे.
दरम्यान आता जानेवारी ते जून 2025 या कालावधीमधील महागाई भत्ता वाढणार असून याबाबतचा निर्णय मार्च 2025 मध्ये होणार आहे. यावेळी देखील महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजेच महागाई भत्ता 56 टक्क्यांवर पोहोचेल.
सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शन धारकांना याचा फायदा मिळणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना
अजून जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील महागाई भत्ता वाढीची भेट मिळालेली नाही. पण लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर त्यांना ही भेट दिली जाणार आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील लवकरच 53 टक्क्यांवर पोहोचणार आहे.