Maharashtra News : अयोध्येत २२ जानेवारी रोजी करोडो भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याचे आपणही साक्षिदार व्हावे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. मात्र सर्वांनाच ते शक्य नाही.
मात्र यासदार विखे यांनी ‘मेरे घर आए राम’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत जो विजेता होईल त्यास खा.विखे हे स्वखर्चाने तेही चक्क विमानाने अयोध्येला घेवून जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अयोध्येत २२ जानेवारी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने नगर शहरात आम्ही ‘मेरे घर आए राम’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप क्रमांक देणार आहोत.
या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपण आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला आहे, याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून पाठवायची आहे. या सर्वांचे अवलोकन करणार आहोत.
यातील प्रत्येक प्रभागातून तीन क्रमांक काढणार आहोत. स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या घरातील प्रत्येकी दोन सदस्यांना विखे कुटुंब स्वखर्चाने विमानाने अयोध्येला घेऊन जावून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे, अशी माहिती खा. सुजय विखे यांनी दिली.