स्पेशल

नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

Published by
Sushant Kulkarni

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.देशाला महासत्ता बनविण्यात सिंहाचा वाटा ठरणार्‍या युवा पिढी समोर अनेक आव्हाने आहेत.मात्र तरीही मार्गदर्शक व आश्‍वासक विचार देवून युवकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून समाजकारण,आरोग्य ,पर्यावरण,शिक्षण , सहकार अशा विविध क्षेत्रात अभ्यासू लोकप्रतिनिधी असलेले जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा.आमदार डॉ.सुधीर तांबे हे खर्‍या अर्थाने जनसामान्यांचे नेता नव्हे मित्र ठरले आहे.

मा.आ.डॉ सुधीर तांबे हे संगमनेर मधील निष्णांत सर्जन,माणसाच्या आरोग्याच्या समस्यांप्रमाणे समाजातील अंधश्रद्धा,रुढी,परंपरा,अस्वछता,दारिद्य्र ह्या समस्या कायमच्या दूर करण्यासाठी 1998 मध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद युवा मंचची स्थापना केली. हजारो युवकांच्या विचारांना दिशा देत निकोप समाज निर्मीतीसाठी त्यांनी रायभर काम सुरु केले.

समाजकारण हा वसा जपतांना अभ्यासू व प्रामाणिकपणा आणि थेटसंपर्क,नाविण्याचा ध्यास या पैलूंमुळे जनतेच्या आग्रहास्तव साहेब राजकारणात आले.मतिमंद व मुक बधिरांसाठी आधारवड ठरलेल्या आ.डॉ.तांबे यांनी संग्राम मुकबधीर विद्यालयाच्या माध्यमातून सेवाभावी काम सुरु ठेवले आहे.प्रथमच संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होवून त्यांनी शहराच्या विकासासाठी दुरदृष्टीतून अनेक ऐतीहासीक निर्णय घेतले.पुढे विविध पदांवर काम करतांना जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध क्षेत्रातील अनेकांनी साहेबांशी संपर्क केला.पुन्हा एकदा पदवीधरांच्या मागणीवरून त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढविली 2009 मध्ये पदवीधर मतदार संघातून महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजयी होण्याचा इतिहास आ.डॉ.तांबे साहेबांनी घडविला .

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीचा व विचारांचा वारसा त्यांना लाभला. त्याच विचारांवर काम करुन आ.बाळासाहेब थोरात रायात महसूलसारख्या महत्वाच्या खात्याची जाबाबदारी सांभाळली आहे.आज उभा महाराष्ट्र आ.बाळासाहेब थोरात यांच्याकडे संस्कृत नेता म्हणून मोठ्या आशेने पाहतो आहे.याच पद्धतीत आ.डॉ तांबे साहेब हे काम करत आहेत .गोर – गरिब असा कोणताही भेद न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सततचा ध्यास घेतलेले पुरोगामी विचारांचे पाईक असलेले आ.डॉ सुधीर तांबे हे अविश्रांत काम करणारे आमदार म्हणून लोकप्रिय झाले आहेत.पाच जिल्ह्याच्या कामांचा प्रचंड व्याप असून ही आ.डॉ.साहेबांनी विविध विषयांचे वाचन व प्रत्येक विषयाचा बारीक अभ्यास केला आहे. यामुळे विधापरिषदेत आपल्या अभ्यासपूर्वक मांडणी वरून त्यांनी प्रत्येक निवेदनावर सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

सुसंस्कृत राजकारणाचा वसा त्यांनी सतत जपला आहे. म्हणून तर खान्देशातील चोपडा,रावेर,ते नगरमधील जामखेडपर्यंत ते लोकप्रिय ठरले आहेत. सतत हसत मुख स्वभाव , सहज होणारा संपर्क आणि कामाच्या पाठपुराव्याची पध्द्त यामुळे पाच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात साहेब लोकप्रिय झाले असून या तालुकयांमधील कार्यकर्त्यांचा सतत ओघ आहे.

विधान परिषदेत काम करतांना शिक्षक सेवकांच्या मानधनाची वाढ ,सर्वांसाठी आरोग्य विमा योजना, बेरोगार महामंडळ,1 जाने 2005 पासून सर्व कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन योजना लागू अशा विविध महत्वांच्या प्रश्‍नासाठी सातत्याने पाठपुरावा करुन ती मार्गी लावली आहे. विनाअनुदानीत शाळांचे प्रश्‍न तसेच तेथे काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सातत्याने आग्रहपुर्वक मांडणी करुन मार्गी लावले आहे.डॉक्टर,वकील,शासकीय ,निमशासकीय कर्मचारी ,शेतकरी,विद्यार्थी,महिला,तरुण,अशा अनेकांच्या विविध अडचणी तत्परतेने सोडवितांना संबधीत प्रश्‍नांसाठी केलेला पाठपुरावा प्रत्येकाच्या आयुष्यात ठेवा म्हणून जपला जात आहे.यामुळे सातत्याने मानसे जोडली जात आहे. काम करतांना आ.डॉ.तांबे साहेब कधीच कोणताही भेदभाव करत नाही. यामुळे पक्षविरहीत अनेक कार्यकर्ते जिवलग मित्र झाले आहेत.म्हणून ते सर्वांचे नेता नव्हे तर मित्र बनले आहे.

संपुर्ण खांन्देशात डॉ.तांबे साहेब यांच्या रुपाने जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. मा.आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी राज्यात महत्चाची जबाबदारी सांभाळली असल्यामुळे खांदेशातील अनेक प्रश्‍न आ.डॉ.तांबे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेली आहे. अफाट स्मरण शक्ती ही सर्वांना आचंबीत करणारी आहे.एकदा भेट झाली की नाव घेवुन हाक मारण्याची पध्दत यामुळे उत्तर महाराष्ट्रात अनेक युवक पहिल्या भेटीला तांबे साहेबांचे चाहते झाले आहेत.मा.नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांची आ.डॉ.तांबे साहेबांना अनमोल साथ मिळाली साहेबांच्या यशात महत्वपुर्ण वाटा उचलतांना महिला सबलीकरणासाठी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून ताईंनी अनेक उपक्रम राबविले आहेत.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक असणार्‍या आ.डॉ.तांबे साहेबांनी हे अभियान सह्याद्री पासून सातपूडा पर्वतांपर्यत पोहचविले आहे .एक प्रेमळ मनाचा माणून म्हणून सर्व युवापीढी आ.डॉ.तांबे साहेब यांच्या कडे बघत आहे.प्रत्येक गोष्टीतील अभ्यास,नवनविन तंत्र-ाानाची माहिती,मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे युवकांचे आयकॉन म्हणून आ.डॉ.तांबे साहेब हे सर्वांपुढे आदर्शवत आहेत.

Sushant Kulkarni