स्पेशल

Scholarship For Women: महिलांना ब्रिटन येथील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी! ब्रिटिश कौन्सिलकडून देण्यात येणार स्टेम शिष्यवृत्ती

Published by
Ajay Patil

Scholarship For Women :- सध्याच्या कालावधीमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसून येत आहेत. देशाच्या संरक्षण क्षेत्रापासून तर अंतराळ संशोधन, आयएएस ते आयपीएस ऑफिसर्स असे कुठलेही क्षेत्र नाही की त्यामध्ये महिला पुढे नाहीत.

तसेच सरकारच्या माध्यमातून देखील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षणाच्या बाबतीत महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे याकरता देखील सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने जर आपण विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून पाहिले तर ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून स्टेम शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आलेली आहे.

ब्रिटनमध्ये जे काही विद्यापीठ आहेत त्यामध्ये विज्ञान तसेच अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता यावे याकरिता ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून स्टेम शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

संपूर्ण जगातील महिलांना घेता येणार या शिष्यवृत्तीचा लाभ

जर तुम्ही उच्चशिक्षित असाल आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असाल तर अशा महिलांसाठी ही स्टेम शिष्यवृत्ती खूप फायद्याची आहे. ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून या शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आलेली आहे.

या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणाकरिता अशा महिलांना ब्रिटनमधील ग्रीनविच युनिव्हर्सिटी, क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ साऊथँम्पटन इत्यादी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

कसे आहे या शिष्यवृत्तीचे स्वरूप?

1- या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून स्टायपेंड, प्रवासाचा खर्च तसेच व्हिजा, आरोग्य विमा तसेच शैक्षणिक शुल्क इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे.

2- या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थिनींना कम्प्युटर सायन्स, फार्मासिटिकल सायन्स, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, सिव्हिल इंजीनियरिंग मॅनेजमेंट, इंटेलिजंट हेल्थकेअर इत्यादी अभ्यासक्रम निवडता येणार आहेत.

3- अधिक माहिती करता इच्छुक विद्यार्थ्यांनी https://www.britishcouncil.in/study.uk/scholarship या वेबसाईटला भेट द्यावी.

Ajay Patil