Smartphone Discount Offer:- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये उत्तम असा वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या सेलच्या माध्यमातून घेऊ शकतात.
फ्लिपकार्टच्या माध्यमातून देखील दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सेल सुरू असून या माध्यमातून अनेक महागड्या अशा स्मार्टफोन्स वर मोठ्या प्रमाणावर सूट दिली जात आहे.
या अनुषंगाने जर आपण मोटोरोला या कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर ही कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये उत्कृष्ट स्मार्टफोन लॉन्च करण्यामध्ये आघाडीवर आहे. मोटोरोलाने मागील काही दिवसा अगोदर Motorola Edge 50 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला होत.
हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन असून फोटोग्राफीची आवड असणारे तसेच मोबाईलवर जास्त पद्धतीने काम करणारे किंवा सेल्फी प्रेमी साठी एक उत्तम असा स्मार्टफोन आहे.या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या स्मार्टफोनच्या 256 जीबी व्हेरियंटची किंमत बघितली तर ते 40 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु फ्लिपकार्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफर अंतर्गत तुम्ही अवघ्या 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात.
दिवाळी पूर्वीची काय आहे फ्लिपकार्टची ऑफर?
Motorola Edge 50 Pro स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्ट वर 41 हजार 999 च्या किमतीला लिस्टेड आहे. मात्र सध्या ग्राहकांना त्यावर तब्बल 28 टक्क्यांची सूट दिली जात असून या सुटीसह या दिवाळीच्या कालावधीत हा स्मार्टफोन 29 हजार 999 मध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात.
म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्ही थेट बारा हजार रुपयांची बचत करू शकणार आहात.यापेक्षा तुम्हाला जास्त पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा घेऊ शकतात. फ्लिपकार्ट ग्राहकांना फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डवर पाच टक्क्यांची एक्सचेंज ऑफर देत आहे.
तसेच तुम्हाला एसबीआय क्रेडिट कार्ड व्यवहारावर 1250 रुपयापर्यंत सुट मिळणार आहे. तसेच तुम्ही जर तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्ही 20000 पेक्षा जास्त बचत करू शकणार आहात.
परंतु यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल की तुम्ही जो स्मार्टफोन एक्सचेंज करणार आहात त्याची सध्याची स्थिती किंवा कंडिशन कशी आहे त्यानुसार तुम्हाला त्या एक्सचेंज ऑफरची किंमत मिळणार आहे.
काय आहे मोटोरोलाच्या या स्मार्टफोन मध्ये विशेष?
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला आयफोन प्रमाणे अल्युमिनियम फ्रेमसह ग्लास बॅक पॅनल मिळतो. यामध्ये तुम्हाला IP68 रेटिंग देण्यात आली असून या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरील्ला ग्लास प्रोटेक्शनसह 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर ऑपरेट होतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी कंपनीने यात स्नॅपड्रॅगन सात Gen 3 प्रोसेसर दिला असून यामध्ये तुम्हाला 12 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते.
उत्तम फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागच्या पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यामध्ये पन्नास, 10 आणि 13 मेगापिक्सल सेंसर देण्यात आला आहे.
इतकेच नाहीतर या स्मार्टफोनमध्ये असलेल्या प्राइमरी कॅमेरात तुम्हाला ओआयएसचे फीचर देखील मिळते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करीता या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.