स्पेशल

Business Idea: 50 हजार हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून महिन्याला 1.50 लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! वाचा या पैसा देणाऱ्या व्यवसायाविषयी

Published by
Ajay Patil

Business Idea :- सध्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या देशापुढे असून या बेरोजगारीच्या निर्मूलनाकरिता सरकारच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात आहेत. नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे आता तरुणांना एखादा व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही.

प्रत्येक जण व्यवसायाची निवड करताना मात्र कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात. जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर एक भली मोठी यादी तयार होईल इतके व्यवसाय आहेत. परंतु या यादीमधून नेमक्या व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे असते.

या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये अशाच एका महत्त्वाच्या व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार गुंतवणूक करून सुरू करता येऊ शकतो व व्यवसाय तुम्ही एकूण खर्चाच्या 50 टक्के नफा मिळवू शकतात.

एलईडी बल्ब तयार करण्याचा व्यवसाय देईल लाखोत नफा

जर तुम्हाला कमीत कमी पैसे गुंतवून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एलईडी बल्बचा व्यवसाय हा एक चांगला व्यवसायिक पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला एलईडी बल्ब बनवायचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही ते अनेक संस्थांकडून घेऊ शकता व हा व्यवसाय सुरू करून कमीत कमी वेळेमध्ये चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

विशेष म्हणजे एलईडी बल्ब तयार करण्याच्या प्लांट उभारण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता नसते. तुम्ही अगदी घरी बसून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता व या माध्यमातून चांगली कमाई करू शकता. सध्या टंगस्टन आणि सीएफएल बल्बच्या तुलनेत बाजारामध्ये एलईडी बल्ब मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहेत.

कसा सुरू कराल हा व्यवसाय?

तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणुकीत एलईडी बल्ब तयार करण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. अनेक संस्था याचे प्रशिक्षण देतात व अशा संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन तुम्ही एलईडी बल्ब बनवू शकता. या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला बल्ब बनवण्यापासून तर आवश्यक मालाची खरेदी तसेच बल्बची विक्री, मार्केटिंग व इतर महत्त्वाच्या गोष्टींची भरपूर माहिती दिली जाते.

तेवढेच नाही तर प्रशिक्षण घेत असताना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून तुम्हाला अनुदान देखील मिळते. तुमच्याकडे जर जास्त भांडवल नसेल तर तुम्ही पन्नास हजार रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकतात.

एलईडी बल्ब व्यवसायातून किती कमाई होते?

साधारणपणे एक एलईडी बल्ब बनवण्याकरिता पन्नास रुपयांची गुंतवणूक करावी लागते. हा एक पन्नास रुपयात बनलेला एलईडी बल्ब कमीत कमी शंभर रुपये किमतीमध्ये तुम्ही बाजारात सहज विकू शकतात. म्हणजेच एका बल्बवर तुम्हाला थेट पन्नास रुपये नफा मिळू शकतो.

जास्त नाही परंतु तुम्ही एका दिवसामध्ये शंभर बल्ब तयार केले व त्यांची विक्री केली तरी देखील तुम्ही पाच हजार रुपयांचा फायदा दिवसाला मिळवू शकतात. तुम्ही जर हळूहळू हा व्यवसाय वाढवत गेलात व दररोज 100 एलईडी बल्ब विकायला सुरुवात केली तर तुम्ही प्रत्येक महिन्याला दीड लाख रुपये सहज कमवू शकता. यामध्ये लक्षात घ्या की हे दीड लाख रुपये फक्त तुमचा नफा असेल.

Ajay Patil