स्पेशल

चालून आली टाटा पंच खरेदी करण्यासाठी मोठी संधी! कराल ऑगस्टमध्ये खरेदी तर मिळेल ‘इतक्या’ हजारांची सुट

Published by
Ahmednagarlive24 Office

सध्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून कार खरेदीवर डिस्काउंट ऑफर दिल्या जात असून ज्या कुणाला कार खरेदी करायची असेल तर याचा लाभ घेऊ शकतात. नामांकित असे कार उत्पादक कंपन्यांच्या अनेक मॉडेल्सवर बंपर असा डिस्काउंट ऑफर सध्या देण्यात येत आहे. त्यामुळे कार खरेदी करण्यासाठी हा एक कालावधी खूप उत्तम आणि फायद्याचा ठरणार आहे.

भारतातील कार उत्पादक कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स एक अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असे नाव आहे व याच कंपनीची टाटा पंच ही कार भारतामध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून देखील ओळखली जाते. या अनुषंगाने तुमचा देखील ह्या महिन्यामध्ये टाटा पंच खरेदी करण्याचा विचार असेल तर हा एक सुवर्णसंधीचा कालावधी आहे. कारण टाटा मोटर्सच्या माध्यमातून या कारवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. टाटा पंचचे इलेक्ट्रिक मॉडेल वगळून पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जन वर ही ऑफर कंपनीने देऊ केली आहे.

टाटा पंच खरेदीवर मिळत आहे सवलत

टाटा मोटर्स या नामांकित कंपनीचे टाटा पंच ही सर्वाधिक विकली जाणारी कार असून या कारवर टाटा मोटरच्या माध्यमातून 25 हजार रुपये पर्यंतचे सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, 2023 मध्ये टाटा मोटर्स ने जेव्हा टाटा पंचचे सीएनजी व्हर्जन लॉन्च केले तेव्हापासून या कारच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

अशातच आता येणारा कालावधी हा भारतामध्ये सणासुदीचा असल्याने त्या अगोदर टाटा मोटर्सच्या माध्यमातून टाटा पंचच्या पेट्रोल व्हर्जन वर 25000 रुपयांपर्यंत आणि सीएनजी व्हर्जन वर 20 हजार रुपयापर्यंतची ऑफर जाहीर केली आहे. इतकेच नाही तर ऑगस्टच्या नवीन ऑफर सह टाटा मोटर्सने टाटा पंच पेट्रोल मॉडेल साठी सात हजार रुपये पर्यंत आणि सीएनजी मॉडेलसाठी सुमारे दोन हजार रुपयापर्यंतची डील वाढवली आहे.

विशेष म्हणजे या सर्व ऑफर 2024 च्या टाटा पंच व्हर्जनवर उपलब्ध आहेत. यामध्ये कार निर्मात्याकडून 20 हजार रुपयांची रोख सवलत आणि पाच हजार रुपयांचा एक्स्ट्रा कार्पोरेट डील देण्यात येत असून दुसरीकडे पंच सीएनजीवर पंधरा हजार रुपयांची सवलत आणि पाच हजार रुपयांचा कार्पोरेट सूट देण्यात येत आहे.

टाटा पंच कारची किंमत आणि वैशिष्ट्ये

पंच सहा हजार आरपीएमवर 86.5 बीएचपी पावर आणि 3150-3350 rpm वर 115 एनएमचा आउटपुट सह 1.2 लिटर टर्बो पेट्रोल रेव्होट्रॉन इंजिनद्वारे समर्थित आहे. हे पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एएमटी या दोन ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसेच सीएनजी मॉडेल त्याच टर्बो पेट्रोल मोटरद्वारे चालवली जाते. परंतु यामध्ये 6000 rpm वर 72.4bhp आणि 3250 आरपीएम वर 103 एनएम पावर जनरेट करते. सध्या या ट्रिममध्ये पाच स्पीड मॅन्युअल मिळते.

जर आपण टाटा पंच पेट्रोल व्हर्जनची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती सात लाख ते दहा लाख वीस हजारच्या दरम्यान आहे. त्यासोबतच टाटा पंच सीएनजी व्हर्जनची किंमत ही सात लाख 23 हजार ते नऊ लाख 85 हजारच्या दरम्यान आहे.

Ahmednagarlive24 Office