स्पेशल

आयुष्यातील एकाच घटनेने जयश्री ताईंना बनवले उद्योजक! 1 लाखात केली उद्योगाला सुरुवात व आज करतात 50 लाखांची कमाई

Published by
Ajay Patil

आयुष्य जगत असताना व्यक्तीला अनेक छोट्या मोठ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. यातील काही प्रसंग वाईट असतात तर काही अतिशय चांगले असतात. परंतु काही प्रसंग वाईट जरी असले तरी आपल्याला भरपूर काहीतरी शिकवून जातात  व काही प्रसंगा मधून आपल्याला प्रेरणा मिळते व कधी कधी अशा प्रेरणेमधून प्रेरित होऊन पूर्ण आयुष्याची वाट किंवा रस्ता आपण त्या पद्धतीने निवडतो.

असाच काहीतरी प्रकार चेन्नईच्या रहिवासी असलेल्या व चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत असलेल्या जयश्री कृष्णमूर्ती यांच्यासोबत घडला व आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगाने त्यांना उद्योजक होण्याला प्रेरित केले व आज त्या यशस्वी उद्योजक म्हणून आपला व्यवसाय पाहत आहेत.

 या घटनेने बनवले जयश्रीताई यांना उद्योजक

एकदा बाहेर गेले असताना त्यांच्यासोबत त्यांचा आठ वर्षाचा मुलगा होता. त्याच्यासाठी त्यांनी एका दुकानातून पेय विकत घेतले. परंतु जेव्हा त्यांनी ते पेय विकत घेतले तेव्हा त्यांना समजले की यामध्ये कोणत्याही प्रकारचे पौष्टिक घटक नाहीत व असे पेय मुलाने पिले तरी त्याच्या शरीराला कुठल्याही प्रकारचे पोषण मिळणार नाही.

या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी विचार करून मुलाच्या भविष्याची काळजीतुन असा एखादा पौष्टिक पदार्थ तयार करायचे ठरवले ज्यामधून मुलांना खूप मोठ्या प्रमाणावर पोषक द्रव्य उपलब्ध होतील व या दृष्टिकोनातून त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला.

याकरिता जयश्री यांनी स्वतः एक रेसिपी तयार केली व ज्या माध्यमातून मुलांना भरपूर पोषण मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न केला. याकरिता त्यांनी भरपूर प्रमाणात लोह तसेच कॅल्शियम, प्रथिने असणारे समृद्ध बाजरी आणि नाचणीचा वापर करण्याचे ठरवले. या सगळ्या प्रयत्नांना जयश्री यांच्या कुटुंबाचा देखील खूप मोठे सहकार्य मिळाले.

जयश्री यांनी तयार केलेली रेसिपी घरच्यांना देखील आवडली व ही रेसिपी त्यांनी त्यांच्या मुलाचे मित्रांना देखील खायला दिली व या माध्यमातून देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळायला लागता व हळूहळू त्यांनी बनवलेल्या पदार्थांची मागणी वाढायला लागली.

जेव्हा मागणी वाढायला लागली तेव्हा आता या छोट्याशा रेसिपीचे व्यवसायात रूपांतर करण्याचे ठरवले व जुलै 2022 मध्ये एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीने स्टार्टअप सुरू केली.

 अशाप्रकारे झाली रसा वेलनेस स्टार्टअपची सुरुवात

जुलै 2022 मध्ये त्यांनी एक लाख रुपये गुंतवणुकीतून स्टार्टअप सुरू करण्याचे ठरवले व याकरिता त्यांनी स्वतःला एक नवीन ओळख निर्माण करून दिली व जयश्री यांच्या फूड ब्रँड चे नाव रसा वेलनेस असून त्यांचा हा ब्रँड आरोग्यदायी फूड म्हणजेच हेल्दी फूड म्हणून ओळखला जातो. त्यांच्या या ब्रँड अंतर्गत 30 पेक्षा अधिक उत्पादन तयार केली जातात.

त्यामध्ये तुम्हाला लाडू पासून बाजरी कुकीज, इन्स्टंट हेल्थ ड्रिंक्स इत्यादी  उत्पादने देखील मिळतात. विशेष म्हणजे त्यांच्या या सगळ्या उत्पादनांमध्ये ग्लुटेन मुक्त पीठ, गुळ आणि बाजरी यांचा समावेश आहे.

जयश्री कृष्णमूर्ती यांनी स्वतःवर विश्वास ठेवून या व्यवसायाला सुरुवात केली व आज हा व्यवसाय हळूहळू यशाच्या शिखराकडे मार्गक्रमण करताना दिसून येत आहे. जयश्री कृष्णमूर्ती यांच्या या व्यवसायाची आज वार्षिक उलाढाल 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून या व्यवसायाने त्यांना एक नवीन ओळख देखील निर्माण करून दिलेली आहे.

Ajay Patil