स्पेशल

पोस्टाच्या ‘या’ योजनेतील महिन्याला केलेली छोटीशी गुंतवणूक बनवेल तुम्हाला लखपती! जमा रकमेवर घेता येईल 50% कर्ज, जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Post Office Saving Scheme- तुम्ही गुंतवणुकीसाठी कुठलाही पर्याय वापरत असाल तर या पर्यायांमध्ये तुम्हाला खूप मोठ्या रकमेची गुंतवणूक करावी लागते असे नसते. तुम्ही महिन्याला एक छोटीशी रक्कम गुंतवून देखील काही वर्षांनी लाखो ते कोटिमध्ये परतावा मिळू शकतात.

परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे तुम्ही गुंतवणुकीत खंड न पाडता सातत्यपूर्ण रीतीने गुंतवणूक करत राहणे व जोपर्यंत ती योजना परिपक्व होत नाही तोपर्यंत गुंतवणुकीत सातत्य ठेवणे गरजेचे असते. गुंतवणुकीसाठी ज्याप्रमाणे बँकांच्या मुदत ठेव योजनांना पसंती दिली जाते.

अगदी त्याच पद्धतीने पोस्ट ऑफिसच्या योजना देखील खूप महत्त्वाच्या असून पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये देखील आता गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसून येत आहे. या पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये जर आपण गुंतवणूकदारांची पसंती पाहिली तर ती साधारणपणे पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजनेला असल्याचे पाहायला मिळते.

पोस्टाच्या आरडी योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करून भविष्यकाळासाठी एक चांगला फंड म्हणजेच पैसे यामध्ये तुम्ही जमा करू शकता.

लहान गुंतवणूकदारांसाठी ही योजना खूपच फायद्याची असून सध्या या योजनेमध्ये जर तुम्ही पाच वर्षाच्या कालावधी करिता गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक 6.70% इतका व्याजदर मिळत आहे. तसेच पोस्टाच्या आरडी योजनेच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेच्या अंतर्गत तुम्ही कर्ज देखील घेऊ शकतात..

कसे आहे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजनेचे स्वरूप?
पोस्टाची आरडी स्कीम ही एक नियमित बचत योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करणे गरजेचे असते. कमीत कमी जोखमीमध्ये उत्तम परतावा हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

या योजनेमध्ये गुंतवणूकदार हे पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतात व या पाच वर्षांमध्ये तुमची जी काही रक्कम जमा होते त्या रकमेवर तुम्हाला व्याज देखील मिळते.

या योजनेमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम जरी जमा करत गेलात तरी दीर्घ कालावधीत लाखो रुपये यामध्ये जमा होतात. सध्या या योजनेमध्ये 6.70% इतका वार्षिक व्याजदर दिला जात आहे. परंतु या योजनेतील व्याजदर सरकारने ठरवलेले असतात व त्या प्रत्येक तिमाही मध्ये बदलू शकतात.

या योजनेत महिन्याला तीन हजार किंवा पाच हजार रुपये जमा केले तर किती परतावा मिळेल?
समजा तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिस आरडी योजनेत तीन हजार रुपये जमा करत आहात तर एका वर्षांमध्ये तुमचे 36 हजार रुपये जमा होतात. जेव्हा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा तुमची संपूर्ण रक्कम एक लाख 80 हजार रुपये या योजनेत जमा होते व या रकमेवर 6.70% च्या व्याजदरासह तुम्हाला जवळपास 34 हजार 97 रुपये इतके व्याज मिळते.

अशाप्रकारे तुमचे जमा एक लाख 80 हजार रुपये व व्याज 34 हजार 97 मिळून तुम्हाला पाच वर्षात दोन लाख 14 हजार 97 रुपये परतावा मिळतो.तसेच या योजनेत तुम्ही 3000 ऐवजी जर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक पाच वर्षांकरिता केली तर तुमचे तीन लाख रुपये जमा होतात.

या जमा रकमेवर तुम्हाला 56 हजार 830 रुपये व्याज मिळते. अशा पद्धतीने पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवून तुमचे जमा झालेले तीन लाख व त्यावर मिळालेले 56 हजार 830 रुपये व्याज असे मिळून तुम्हाला पाच वर्षात पाच लाख 56 हजार 830 रुपये मिळतात.

या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते कर्ज?
या योजनेत गुंतवणूक केल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमची जी काही रक्कम या योजनेत जमा होते त्या आधारावर तुम्हाला कर्ज देखील घेता येऊ शकते. समजा तुम्हाला अचानकपणे पैशांची गरज भासली तर तुम्ही या योजनेमध्ये तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते.

परंतु यामध्ये प्रमुख अट अशी आहे की तुम्हाला या योजनेत कमीत कमी तीन वर्ष गुंतवणूक करायला पूर्ण झालेले असावे. या कर्जावर तुम्हाला साधारणपणे तुम्ही जमा केलेल्या रकमेवर जितका व्याजदर मिळतो त्यापेक्षा दोन टक्के अधिक व्याजदराने हे कर्ज मिळते.

अशा पद्धतीने मुलांचे शिक्षण तसेच लग्न किंवा घराच्या कामासाठी तुम्हाला बचत करायची असेल व चांगला परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिस आरडी स्कीम हा एक उत्तम पर्याय आहे.

Ajay Patil