सर्पाच्या लांबीची तलवार सापडली ! थेट चौथ्या शतकाच्या…

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : जपानमध्ये सापडलेल्या सापाच्या लांबीच्या तलवारीचा वापर कर्मकांडात केला जायचा, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. ही तलवार ७ फूट ७ इंचाची २०२० मध्ये नारा सिटीमधील जपानमधील सर्वात मोठ्या दफनभूमी टोमिओ मारुयामा तुमुलसमधील कबरीतून खोदण्यात आली होती.

ही तलवार चौथ्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. नारा प्रिफेक्चरल काशिहारा पुरातत्त्व संशोधन संस्था आणि नारा सिटी बोर्ड ऑफ एज्युकेशनने ही माहिती दिली. तलवारीची मूठ आणि आवरण शाबूत आहे. मूठीसह तिची लांबी २८५ सेंटीमीटर आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचीन विधीदरम्यान उभ्या अवस्थेत लांब तलवारीचा वापर करण्यात आला असावा. सहा ठिकाणी ती वाकलेल्या अवस्थेत आहे. ढालीच्या आकाराच्या ब्राँझच्या आरशासोबत ही तलवार सापडली.

‘नेन्डोकाकू’ नावाच्या मातीच्या दफन दालनातील लाकडी शवपेटीच्यावर ही तलवार होती. लाकडी शवपेटी सुस्थितीत होती. तलवारीचे टोक लाकडाचे होते. ते काठीच्या आकाराचे होते. तलवार सरळ उभी असताना थेट जमिनीला स्पर्श होऊ नये म्हणून अशी रचना करण्यात आली होती.

काशिहारा पुरातत्त्व संशोधन संस्थेचे क्युरेटरीय सल्लागार कोसाकू ओकाबायाशी यांनी सांगितले ‘लाकडी टोकामुळे महत्त्वाच्या समारंभात औपचारिक पहारा म्हणून तिचा वापर केला जात असे.’

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe