भारतामध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून कमीत कमी किमतीतले उत्तम फीचर्स असलेले दमदार स्मार्टफोन सध्या लॉन्च करण्यात येत असून त्यामुळे या सणासुदीच्या कालावधीमध्ये ग्राहकांना अतिशय कमी किमतींमध्ये फोन खरेदी करता येणे शक्य होणार आहे.
ग्राहक देखील जेव्हा स्मार्टफोन खरेदी करायला बाजारात जातात तेव्हा कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगली वैशिष्ट्ये ज्या फोन मध्ये मिळतील अशा फोनच्या शोधात असतात. त्यामुळे आता ग्राहकांना देखील विविध स्मार्टफोनचे पर्याय सध्या बाजारात उपलब्ध झालेले आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण पाहिले तर आयटेल या कंपनीने मंगळवारी भारतामध्ये मंगळवारी दोन अतिशय कमी किमतीतले नवीन स्मार्टफोन लॉन्च केले असून त्यांचे नाव आहे आयटेल ए 50 आणि आयटेल ए 50 सी हे होय. या दोन्ही स्मार्टफोनची माहिती आपण या लेखात बघू.
आयटेलने लॉन्च केले स्वस्तातले स्मार्टफोन
1- आयटेल ए 50 सी स्मार्टफोनची वैशिष्ट्ये– या फोनमध्ये ऑक्टा कोर युनीसॉक टी 603 चिप्स देण्यात आला असून या फोनमध्ये तीन जीबी रॅम आणि 64 जीबी चा स्टोरेज देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा हा आठ मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा असून उत्तम सेल्फीकरिता पाच मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
आयटेलच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आलेली असून ती 10W चार्जिंगला सपोर्ट करते. परंतु कंपनीने या फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी मात्र दिलेली नाही.
2- आयटेल ए 50 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये– आयटेल ए 50 मध्ये अँड्रॉइड 14 उपलब्ध असून या फोनमध्ये 6.56 इंच डिस्प्ले देण्यात आलेला आहे व तो होल पंच कट आउटसह येतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर युनीसॉक सी 603 देण्यात आला असून या फोनमध्ये चार जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी पर्यंत स्टोरेज आहे.
या फोनमध्ये तुम्ही रॅम आठ जीबी पर्यंत देखील वाढवू शकतात. तसेच आयटेलने या स्मार्टफोनमध्ये आठ मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा आणि पाच मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली असून ती 10W चार्जिंगला सपोर्ट करते. आयटेलने मात्र या फोनमध्ये देखील 5G कनेक्टिव्हिटी दिलेली नाही.
किती आहे या दोन्ही फोनची किंमत?
आयटेलने लॉन्च केलेले आयटेल ए 50 ची सुरुवातीची किंमत सहा हजार 99 रुपये आहे व या किमतीत हा फोन तीन जीबी+ 64 जीबी स्टोरेजमध्ये येतो. तर चार जीबी+ 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6499 आहे व हे मॉडेल सायन ब्ल्यू तसेच लाईन ग्रीन, सिमर गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे.
तसेच आयटेल ए 50 सी च्या दोन जीबी+ 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5699 आहे. दोन्ही फोन तुम्ही ॲमेझॉन इंडिया वरून खरेदी करू शकतात.