‘या’ तारखेपर्यंत Aadhar Card मोफत अपडेट करता येणार ! घरबसल्या आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस कशी आहे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card News : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. कोणतेही शासकीय अथवा निमशासकीय काम आधार कार्ड विना पूर्ण होत नाही. भारतात साधे एक सिम कार्ड काढायचे असले तरी देखील आधार कार्ड लागते. आधार कार्डचा वापर बँकेत खाते खोलण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी, मतदान कार्ड काढण्यासाठी, मतदान करण्यासाठी, केवायसी करण्यासाठी तसेच यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जात आहे.

विशेष म्हणजे जर तुम्ही कर्ज काढत असाल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू फायनान्स वर खरेदी करत असाल तरी तुम्हाला आधार कार्ड द्यावे लागते. याशिवाय इतरही अन्य छोट्या मोठ्या कामांसाठी आधार कार्डचा उपयोग होतो. यावरून आधार कार्ड हे एक महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहे हे आपल्याला समजते. मात्र हे शासकीय दस्तऐवज अपडेटेड असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड मध्ये असणारी माहिती अपडेटेड असली तरच याचा उपयोग होतो. जर आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर तुमची अनेक महत्त्वाची कामे अटकू शकतात. दरम्यान आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून भारतीय नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे.हे कार्ड जर 10 वर्षांपूर्वी बनवलेले असेल तर ते अपडेट करणे आवश्यक आहे. खरेतर Aadhar Card मोफत अपडेट करण्याची सुविधा 14 मार्चपर्यंत उपलब्ध होती.

मात्र 14 मार्च 2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली ही सुविधा नागरिकांच्या सोयीसाठी आणखी एक्सटेंड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची अंतिम मुदत 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यामुळे जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतीही माहिती अपडेट करायची असेल, तर तुम्ही कोणतेही शुल्क न भरता Aadhar अपडेट करू शकता. दरम्यान आता आपण घरबसल्या आधार कार्ड विनाशुल्क कसे अपडेट करायचे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड घरबसल्या कसे अपडेट करणार

myAadhaar Portal वर आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा 14 जून पर्यंत मोफत राहणार आहे. जर तुम्हालाही तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर यासाठी सर्व प्रथम uidai च्या अधिकृत वेबसाइटवर अर्थातच https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागणार आहे. या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला याच्या होमपेजवरील My Aadhaar Portal वर जावे लागणार आहे.

मग आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP वापरून लॉग इन करायचे आहे. एकदा की या वेबसाईटवर तुम्ही लॉगिन घेतली की तुम्हाला तुमचे आधार कार्ड मधील तपशील अपडेट करता येणार आहेत. यासाठी तुम्हाला तुमचे तपशील तपासायचे आहेत आणि तपशील योग्य असल्यास, योग्य बॉक्सवर टिक करायची आहे.

जर डेमोग्राफिक माहिती चुकीची असेल किंवा तुम्हाला तुमच्या डेमोग्राफिक माहितीमध्ये काही बदल करायचे असतील तर ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडून दस्तऐवज अपलोड करावे लागणार आहेत. हे दस्तऐवज JPEG, PNG आणि PDF स्वरूपात अपलोड केले जाऊ शकतात. पण, मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे.

जर तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटरवर जाऊन किंवा आधार सेंटरवर जाऊन आधार कार्ड अपडेट करत असाल तर तुम्हाला यासाठी पन्नास रुपये एवढे शुल्क द्यावे लागणार आहेत. तसेच तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मधील बायोमेट्रिक अपडेट करायचे असतील तर यासाठी तुम्हाला फक्त आधार सेंटरवर जाऊनच हे काम करता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला शंभर रुपये एवढे चार्जेस द्यावे लागणार आहेत.