स्पेशल

आधार कार्ड वरील जन्मतारीख आणि नाव बदलणे झाले आता अवघड !

Published by
Ajay Patil

Aadhar Card Rule:- आपण कुठल्याही प्रकारचे जेव्हा शासकीय व इतर काही महत्त्वाची कामे करायला जातो तेव्हा आपल्याला बऱ्याच कागदपत्रांची आवश्यकता भासते. अशा आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून आधार कार्डचा वापर हा तुम्हाला अगदी कुठल्याही प्रकारचे शासकीय काम असो किंवा बँकेत खाते उघडणे असो किंवा इतकेच नाही तर तुम्हाला साधे सिम कार्ड घ्यायचे असेल तरी देखील तुम्हाला आधार कार्ड लागते.

म्हणजे सध्या अशी परिस्थिती आहे की, बहुतांश कामे हे आधार कार्ड शिवाय पूर्ण होत नाही. याकरिता प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे. तसेच प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ हा आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला दिला जातो. त्यामुळे आधार कार्ड वर असलेल्या संपूर्ण तपशील खूप महत्त्वाचा असतो.

आधार कार्डवर थोडी जरी चूक राहिली तरी तुम्हाला खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी अशा काही चुका जर आधार कार्डवर असतील तर आपल्याला आधार कार्ड अपडेट करावे लागते किंवा त्यावर बदल करावे लागतात.

बऱ्याचदा कित्येक जणांच्या आधार कार्डवर जन्मतारीख किंवा नावात चूक झालेली असते व यासंबंधीची चूक सुधारण्यासाठी आपल्याला आधार कार्ड वरील नावात किंवा जन्म तारखेमध्ये बदल करावा लागतो

. परंतु आता तुम्हाला जर आधार कार्ड वर कोणत्याही प्रकारच्या तपशीलामध्ये बदल करायचा असेल तर यासंबंधीची प्रक्रियेमध्ये आता सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात आला असून याबाबतची माहिती यूआयडीएआय आधार कार्ड डॉट कॉमने दिली आहे. या माहितीनुसार बघितले तर आधार कार्ड वरचे नाव आणि जन्मतारीख बदलणे आता आणखी अवघड झाले आहे.

 आधार कार्डवरील जन्म तारीख आणि नाव बदलणे झाले अवघड

सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड संबंधित महत्त्वाच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले असून त्या बदलानुसार बघितले तर आधार कार्ड वरचे नाव आणि जन्मतारीख बदलायचे असेल तर आता ती प्रक्रिया अवघड करण्यात आलेली आहे. या अगोदर तुम्हाला जर आधार कार्ड वरील नाव आणि जन्मतारीख बदलायचे असेल तर ते सहजपणे शक्य होते.

परंतु आता या बदललेल्या नियमानुसार बघितले तर ही प्रक्रिया काहीशी अवघड होणार आहे. जन्मतारीख किंवा नावात जर काही चूक असेल तर आता ही चूक सुधारणे म्हणजे एक प्रकारची डोकेदुखीच ठरणार आहे. तुम्हाला जर आता आधार कार्ड वरची जन्मतारीख किंवा नाव दुरुस्त करायचे असेल तर तुम्हाला आता बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट देणे गरजेचे आहे.

या अगोदर अशा कुठल्याही प्रकारचे कागदपत्र तुम्हाला सादर करण्याची गरज नव्हती. परंतु जर आपण ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक महिलांकडे किंवा व्यक्तींकडे जन्माचा दाखला किंवा स्कूल सर्टिफिकेट नसते व यामुळे आधार कार्डवरची जन्मतारीख किंवा नावात बदल करायचा असेल तर अनेक अडचणी येऊ शकतात.

ज्या व्यक्तीकडे बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला नसेल असे व्यक्तींना एमबीबीएस डॉक्टरने अटेस्ट केलेले पत्र किंवा गॅझेटेड अधिकाऱ्याने अटेस्ट केलेले पत्र जोडणे आवश्यक आहे. परंतु ज्या व्यक्तींकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नाही अशांना मात्र खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

अशाप्रकारे हा नवीन नियम झाल्यामुळे आता आधार कार्डवर असलेल्या चुका दुरुस्त करायच्या असतील तर मात्र ही प्रक्रिया आता खूप गुंतागुंतीची झालेली आहे. अशा प्रकारच्या चुका जर असतील तर मात्र नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Ajay Patil