स्पेशल

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी कृषिमंत्र्यांनी जारी केलेला नंबर नॉट रीचेबल; आता शेतकऱ्यांनी करावं काय?

Published by
Ajay Patil

Abdul Sattar News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऐन काढणीच्या अवस्थेत असलेले पीक यामुळे भुईसपाट झाले आहे. राज्यात जवळपास 4 मार्चपासून अवकाळी सुरु झाला आहे. मध्यँतरी पावसाने उघडीप दिली होती. पण आता 14 मार्चपासून सलग अवकाळी पाऊस आणि गारपीट राज्यातीलं बहुतांशी भागात होत आहे.

आज मात्र राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची उघडीप पाहायला मिळाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे, फळबाग तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होणे गरजेचे आहे.

दरम्यान राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना नुकसानीबाबत माहिती देण्यासाठी आणि नुकसानीचे फोटो पाठवण्यासाठी फोन नंबर जारी केले होते. मात्र या फोन नंबर वर फोन लागत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत. शिवाय या नंबरच्या व्हाट्सअप वर फोटो देखील पाठवता येत नाहीयेत.

हे पण वाचा :- अखेर तोडगा निघाला! कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची घोषणा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय, चर्चेत नेमकं काय ठरलं, पहा

त्यामुळे आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बेजार झालेले आहेत शेतकऱ्यांच्या पुढ्यात नवीनच संकट उपस्थित झाला आहे. कृषिमंत्री म्हणतात नुकसानीची माहिती कळवा मात्र नुकसानीची माहिती कळवण्यासाठी जारी केलेले फोन नंबरच नॉटरीचेबल असल्याने शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कशी पोहोचवायची हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

दरम्यान याबाबत विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी विचारणा केली असून यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा अशी मागणी केली आहे. खरं पाहता 18 मार्च 2023 रोजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीची माहिती थेट कृषी मंत्रालयाला पाठवण्याच आवाहन केलं. यासाठी काही नंबर देखील जारी केलेत.

यामध्ये कृषिमंत्र्यांचा वैयक्तिक नंबर देखील असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच सत्तार यांनी आपल्या शासकीय निवासस्थानावरील मोबाईल क्रमांक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी जारी केले आहेत. मात्र सदर क्रमांकावर फोन केला असता फोन लागत नसून व्हाट्सअप वर इमेज पाठवली असता त्यावर काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख यांच्यावर पैसा घेऊन हवामान अंदाज सांगण्याचा आरोप; महाराष्ट्रात एकच खळबळ, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी ९४२२२०४३६७ मोबाईल क्रमांक व ०२२-२२८७६३४२, ०२२-२२८७५९३० अशी दोन कार्यालयातील लँडलाईन क्रमांक आणि शासकीय निवासस्थानाचा ०२२-२२०२०४३३ लँडलाईन क्रमांक नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी जारी केले होते. मात्र आता या क्रमांकावर संपर्क साधताना शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याने आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी परिस्थिती यावेळी शासनाच्या कार्यपद्धतीची झाली आहे.

यामुळे बेजार झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सुलतानी चेष्टा केली जात असल्याचा आरोप यावेळी सरकारवर होत आहे. निश्चितच या प्रकरणात शासनाने तातडीने लक्ष घालत शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती देण्यासाठी पर्यायी व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

नुकसानीची माहिती जर शासनापर्यंत वेळेत पोहोचली नाही तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागू शकते. यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांनी देखील विधानसभेत केली आहे.

हे पण वाचा :- मोदीसाहेब, माझी सर्व जमीन तुमच्या नावावर करतो, तुम्ही फक्त ‘हे’ काम करून दाखवा; महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच थेट पंतप्रधानांना आव्हान

Ajay Patil

Published by
Ajay Patil