Vima Sakhi Yojana:- समाजातील विविध घटकांकरिता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक लाभाच्या योजना राबवल्या जातात व त्या माध्यमातून अशा घटकांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमानात सुधारणा व्हावी व ते स्वावलंबी व्हावेत हा त्यामागचा उद्देश असतो.
अगदी याचप्रमाणे महिलांसाठी देखील अनेक योजना राबवल्या जातात. उदाहरणच घ्यायचे तर महाराष्ट्र सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली माझी लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय ठरली व या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे आर्थिक लाभ दिला जातो.
जेणेकरून महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतील व त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनातून अशा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असते.
अगदी याच प्रमाणे आता केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या माध्यमातून देशातील महिलांसाठी विमा सखी योजना सुरू करण्यात आली असून नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत येथून या योजनेचा शुभारंभ केला. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे व महिलांना या योजनेचा लाभ काय मिळणार? याबद्दलची माहिती या लेखात बघू.
काय आहे नेमकी विमा सखी योजना?
विमा सखी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली व ही योजना सुरू करण्यामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करणे हा आहे.
ज्या महिलांचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेमध्ये महिलांना आवश्यक प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देण्याची तरतूद असल्याने नक्कीच या योजनेचा फायदा महिलांना होणार आहे.
या योजनेसाठी आवश्यक असलेली पात्रता
1- विमा सखी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे.
2- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेकडे हायस्कूल किंवा दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
3- तसेच ज्या महिलांचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान आहे अशा महिला याकरिता अर्ज करू शकतात.
काय मिळेल या योजनेचा फायदा?
विमा सखी योजनेमध्ये जेव्हा महिला सहभागी होतील तेव्हा महिलांना अगोदर तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाईल व त्यामध्ये आर्थिक व्यवहारांचे ज्ञान महिलांना दिलं जाईल. तसेच प्रशिक्षणा दरम्यान महिलांना काही निश्चित रक्कम( सुमारे दोन लाखापेक्षा जास्त ) दिले जाईल व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला एलआयसी विमा एजंट म्हणून काम करू शकतील.
इतकेच नाही तर ज्या महिला पदवीधारक असतील त्यांना एलआयसी मध्ये विकास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी देखील मिळेल. तसेच ज्या महिला दहावी पास असतील त्यांना दर महिन्याला दोन पॉलिसी विकण्याचे टार्गेट दिले जाईल.
म्हणजेच पहिल्या वर्षी 24 पॉलिसींची विक्री करावी लागेल व या योजनेतून बोनस देखील दिला जाईल. तसेच कमिशन म्हणून 48 हजार रुपये मिळतील. म्हणजेच एका पॉलिसीसाठी चार हजार रुपये दिले जातील.