मुंबई, पुणे, नागपूरनंतर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार 3 नवे मेट्रो मार्ग ? कसे असणार रूट ? कोणत्या भागातून धावणार Metro

Published on -

Maharashtra Metro News : मुंबई पुणे नागपूर नंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका बड्या शहराला लवकरच मेट्रोची भेट मिळणार आहे. सध्या राज्यातील मुंबई पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रो सुरू आहे. दुसरीकडे राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील आणखी एका मोठ्या शहराला म्हणजेच नाशिक शहराला देखील येत्या काही वर्षात मेट्रोची भेट मिळणार असे दिसते. ठाण्यात देखील मेट्रो मार्गांची कामे सुरू आहेत. दरम्यान आता ठाणे मेट्रोबाबतच एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरंतर मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातील शहरे एकमेकांना जोडण्यासाठी गेल्या सहा ते सात वर्षांपासून मेट्रोचे मार्ग विकसित केले जात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरू असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मेट्रो प्रकल्पाची कामे सध्या संथगतीने सुरू असल्याची बाब समोर आली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून ही चिंताजनक गोष्ट समोर आली असून यामुळे ठाणे जिल्ह्याला मेट्रोचा लाभ मिळण्यासाठी आणखी काही वर्ष वाट पहावी लागणार असल्याचे दिसते.

शहरात विकसित होणार तीन नवे मेट्रो मार्ग

ठाणे जिल्ह्यातील मेट्रोची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत. ठाणे, भिवंडी, कल्याण, मिरारोड यासह तळोजा परिसराला मेट्रो मार्गाने जोडले जाणार आहे. यामध्ये कल्याण ते तळोजा दरम्यान मेट्रो मार्ग तयार होणार आहे. वडाळा ते कासारवडवली तसेच ठाणे भिवंडी कल्याण यादरम्यान सुद्धा मेट्रो मार्ग तयार होणार आहे. परंतु या सर्व प्रकल्पाची कामे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असली तरी देखील सध्या या प्रकल्पांची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली असून यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी काही वर्षे मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे जेमतेम 3 टक्के इतकी पूर्ण झाली आहेत. तसेच वडाळा ते कासारवडवली मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्ष लागणार असल्याचे बोलले जात आहे शिवाय ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसाठी चार वर्षे नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे.

कसे आहेत ठाणे जिल्ह्यातील मेट्रोचे रूट?

वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाचे काम 2018 मध्ये हाती घेण्यात आले होते. हा सुमारे 32 किलोमीटर लांबीचा मार्ग असून या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 75 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 25 टक्के काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल अशी शक्यता आहे. या प्रकल्पाची कामे एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण होतील आणि त्यानंतर हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या मार्गालाच कासारवडवली ते गायमुख हा मेट्रो मार्ग जोडला जाणार आहे. या मेट्रोमार्गाबाबत बोलायचं झालं तर हा मेट्रो मार्ग 2.7 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 86 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 14 टक्के काम या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2025 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर मग हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रोमार्गाबाबत बोलायचं झालं तर हा 23.5 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग असून याचे आत्तापर्यंत 94% इतके काम पूर्ण झाले आहे मात्र प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी 2029 उजाडेल अशी शक्यता आहे. मिरारोड येथील गायमुख ते शिवाजी चौक या मेट्रो प्रकल्पाचे काम देखील 2017 पर्यंत पूर्ण होणार असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe