स्पेशल

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीनंतर आता शेतकरी भावालाही मिळणार पैसे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील एक कोटी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. नमो शेतकरी महा सन्मान नीधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत वितरित केला जाईल यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्रातील सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली असून याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये

या योजनेअंतर्गत देशभरातील नऊ ते दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. यासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. 17 वा हप्ता हा 18 जून 2024 ला वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता.

तीन हप्ते वितरित

आता या योजनेच्या पुढील हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरता लागून आहे. केंद्रातील या लोकप्रिय योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. राज्यातील ही योजना पीएम किसान सारखीच आहे. राज्याच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत. हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणेच वितरित होणार आहेत. आतापर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

पीएम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना सोबतच दिला गेला होता. म्हणजेच नमो शेतकरीचे मागील हफ्ता मिळून जवळपास पाच ते सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे. यामुळे याच्या चौथ्या हप्त्याची शेतकऱ्यांकडून सातत्याने विचारणा केली जात आहे. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेचा हप्ता 21 ऑगस्ट 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती दिली आहे.

एक कोटी शेतकऱ्यांना दिलासा

परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता वितरित केला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व मान्यवरांच्या हस्ते आज हा हफ्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरंतर हा कृषी महोत्सव 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान आयोजित राहणार आहे.

महोत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

आज दुपारी एक वाजेपासून या कृषी महोत्सवाला सुरुवात होणार आहे. बाजार समितीच्या आवारात या कृषी महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री चौहान यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने प्रथमच परळी येथे हा कृषी महोत्सव आयोजित झाला आहे. यामुळे या महोत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24