स्पेशल

Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! यंदाच्या खरीप हंगामात मिळणार हेक्टरी 60 हजार रुपये पीककर्ज, सोयाबीन आणि इतर पिकांना किती ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Agriculture Loan : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाची पूर्वतयारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मान्सूनच्या आगमनाला मात्र एका महिन्याचा काळ शिल्लक असून खरीप हंगाम देखील येत्या एका महिन्यात सुरू होणार आहे.

या पार्श्वभूमीवर जमिनीची पूर्व मशागत करण्याच काम शेतकऱ्यांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान एक जून पासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाण्याची उपलब्धता होणार आहे. यामुळे एक जून नंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी भांडवलाची आवश्यकता भासणार आहे.

या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कपाशी या पिकाकरीता हेक्टरी साठ हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.

सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 51 हजार कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खरं पाहता, खरीप हंगाम सुरू होण्याचा दोन महिने आधी पीक कर्जाचे दर आतापर्यंत निश्चित केले जात होते. यंदा मात्र पीक कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी उशीर झाला आहे.

यामुळे अमरावती जिल्ह्यात काही बँकांनी खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप सुरू केले होते. दरम्यान राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी 1450 कोटी रुपयांचे लक्षाॅंक देण्यात आले आहे. तसेच तांत्रिक सभेने खरीप हंगामातील पीक कर्ज

वाटपासाठी निश्चित केलेले दर सर्व बँकांनी आता स्वीकृत केले आहेत. अशा परिस्थितीत आता आपण कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती कर्ज मिळणार याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

हाती आलेल्या माहितीनुसार या खरीप हंगामासाठी बँकेच्या माध्यमातून कापूस (कोरडवाहू) ६० हजार, कापूस (बागायती) ७० हजार, ज्वारी – ३१ हजार, तूर – ४० हजार, सोयाबीन – ५१ हजार, सूर्यफूल -२७ हजार, उडीद- २४ हजार, गहू – ४२ हजार, करडई – ३४ हजार, हरभरा (जिरायती) – ४० हजार,

हरभरा (बागायत) – ४५ हजार, धान – ४५ हजार, कांदा – ७२ हजार, भाजीपाला – ४५ हजार, भुईमूग खरीप- ४२ हजार, भुईमूग (उन्हाळी)- ५० हजार, संत्रा- १.०५ लाख, केळी – १.१० लाख, ऊस – १.४५ लाख या दराने पीक कर्ज वाटप केले जाणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24