स्पेशल

सावधान ! विजांच्या कडकडाटासह राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ एप्लीकेशनचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला

Published by
Ajay Patil

Agriculture News : राज्यात 14 मार्चपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मात्र पाऊस पडत आहे. विज पडण्याच्या घटनेने अनेक ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. यामुळे काही ठिकाणी पशुधनाची हानी झाली आहे. दरम्यान राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे. काल देखील राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली होती.

हे पण वाचा :- शेतकरी पुत्रांची फिनिक्स भरारी ! आपल्या कौशल्याच्या जोरावर मिळवलं 18 लाखांच पॅकेज

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता सावध राहण्याचा इशारा दिला जात आहे. विजांच्या कडकडाटासह राज्यात पुढील तीन दिवस पाऊस पडणार आहे. यामुळे वीज पडून जीवित हानी देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटातून स्वतःला सावरले पाहिजे असा सल्ला तज्ञ लोकांकडून दिला जात आहे. शेतकऱ्यांनी विज पडण्याचे संभाव्य स्थान किंवा ठिकाण माहित करून घ्यावे. यासाठी शेतकऱ्यांनी दामिनी लाइटनिंग अलर्ट हे ॲप्लिकेशन उपयोगात आणावे.

हे पण वाचा : देशातील पहिली निओ मेट्रो महाराष्ट्रात ! निओ मेट्रो प्रकल्पाबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिल्यात ‘या’ सूचना, पहा काय म्हटलं पीएमओने…..

हे एप्लीकेशन वीज कुठे पडू शकते याचा अचूक अंदाज बांधते. यामुळे शेतकऱ्यांनी या एप्लीकेशनचा उपयोग करून आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध आहे. यासाठी आपणास आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमधून प्ले स्टोअर वर व्हिजिट करायचे आहे.

त्या ठिकाणी दामिनी लाइटनिंग अलर्ट Damini Lightening Alert असं नाव टाकायचं आहे आणि सर्च करून अँप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे. किंवा आपण https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini या लिंक वर जाऊन दामिनी लाइटनिंग अलर्ट हे एप्लीकेशन डाउनलोड करू शकता. निश्चितच या एप्लीकेशनचा उपयोग करून शेतकरी बांधवांना नेमकी वीज कुठे पडेल याची अचूक माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले व आपल्या पशुधनाची काळजी घेता येणे शक्य बनणार आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘त्या’ जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा, कर्जमाफीची मोठी घोषणा

यासोबतच शेतकरी बांधवांनी आपले पशुधन घोट्यातच बांधून ठेवावे. जनावरांना झाडाच्या खाली बांधून ठेऊ नये. स्वतः झाडाखाली उभे राहू नये. याशिवाय शेतात काम करताना दोन व्यक्तीच्या मध्ये जेवढे अधिक अंतर ठेवता येईल तेवढे अंतर राहू द्यावे. विजांचा कडकडाट अन मेघगर्जना होऊ लागली की सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी. झाडाखाली मात्र थांबू नये. यासोबतच शेतकरी बांधवांनी काढणी झालेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. अशा सूचना कृषी क्षत्रातील जाणकार लोकांकडून दिल्या जात आहेत.

हे पण वाचा :- 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची शेवटची यादी आली; पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ, तुम्ही पण आहात का यादीत, पहा

Ajay Patil

Published by
Ajay Patil