स्पेशल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी निघाली; तुमचा नंबर लागला की नाही?, पहा…..

Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी वेगवेगळ्या योजना गेल्या काही वर्षांपासून राबवत आहे. या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून विहिरीसाठी, शेततळ्यांसाठी, पाईपलाईनसाठी अनुदान देण्याचे काम शासनाकडून केले जात आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही देखील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक राज्य शासनाची अति महत्त्वाची योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान आता या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी वर्ष 2022-23 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी निघाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातून 944 लाभार्थ्यांची निवड झाली आहे.

हे पण वाचा :- टाटा है तो सब मुमकिन है ! टाटाच्या ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे लवकरच बनणार धनवान; कारण की…..

पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यासाठी 2022-23 या वर्षाकरिता नैतिक शेततळे या घटकासाठी सात कोटी 80 लाख रुपयांचा आर्थिक लक्षांक देण्यात आला होता. दरम्यान या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 1647 शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले होते.

या अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी 944 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली आहे. यापैकी 216 लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना शेततळे बनवणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर या 216 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 47 शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी आपले शेततळ्याचे काम पूर्ण केले आहे.

हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर; पर्यटन संचालनालयात ‘या’ पदासाठी भरती सुरू, पहा डिटेल्स

यामुळे या संबंधित 47 शेतकऱ्यांना मोका तपासणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम देखील वितरित झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या 47 शेतकऱ्यांना 28 लाख 73 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. निश्चितच, जिल्ह्यातील जवळपास एक हजार शेतकऱ्यांना आता वैयक्तिक शेततळ्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे.

यामुळे या शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा या ठिकाणी मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75000 पर्यंतचे अनुदान देय आहे. हे अनुदान आकारमानानुसार देय असते. दरम्यान आता आपण अनुदानाच वितरण कशा पद्धतीने होते याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी खुशखबर; पुण्यात ‘या’ ठिकाणी आहे नोकरीची संधी, इथे पाठवा अर्ज

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडीबीटीवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सर्वप्रथम संगणकीय लॉटरी द्वारे निवड केली जाते. लॉटरीमध्ये जे शेतकरी निवडले जातात त्यांना नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून सुचित केले जाते. एसएमएस प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात. या कागदपत्रांची मग छाननी संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होते. यानंतर मग तालुका कृषी अधिकारी च्या माध्यमातून पूर्वसंमती संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते.

यानंतर मग संबंधित शेतकऱ्याला काम पूर्ण करावे लागते आणि काम पूर्णत्वाचा दाखला पुन्हा एकदा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे द्यावा लागतो. यानंतर मग संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्याची मोका तपासणी या ठिकाणी होते. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर मग जिल्हास्तरावरून अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. या अशा पद्धतीने महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्वच योजनेचे अन सर्वच घटकांचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्याची पद्धत आहे.

हे पण वाचा :- कलिंगड शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; 10 गुंठ्यातला प्रयोग ठरला लाख मोलाचा, पहा ही यशोगाथा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts