स्पेशल

मोठी बातमी ! ‘या’ पशुपालक शेतकऱ्यांना एक कोटी 22 लाखाचे अनुदान वाटप; आणखी 32 लाख होणार ‘या’ दिवशी वितरित

Published by
Ajay Patil

Agriculture News : पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता, लंपी स्किन या आजारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील पशुपालक शेतकरी संकटात सापडले होते. या आजारामुळे देशभरात लाखो पशुधन दगावले.

महाराष्ट्रात देखील या आजारामुळे हजारो पशुधन मृत्यूच्या विळख्यात गेले आणि पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला. पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेले पशुधन या आजारामुळे मृत्युमुखी पडल्याने पशुपालकांपुढे मोठ संकट उभ राहील. अशा परिस्थितीत पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला.

शासनाने लंपी स्कीन या आजारामुळे दगावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात संबंधित पशुपालकांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आतापर्यंत एक कोटी 22 लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. दरम्यान अजून 32 लाखाचे अनुदान संबंधित बाधित पशुपालक शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. यामुळे निश्चितच बाधित पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात 909 पशुपालक शेतकऱ्यांची या आजाराने पशुधन दगावलीत. यापैकी 520 पशुपालक शेतकऱ्यांना एक कोटी 22 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी 390 पशुपालक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. यामुळे अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान वितरित व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ऑगस्ट महिन्यापासून राज्यात लंपी आजाराने दगावलेल्या पशुधनाचा मोबदल्यात संबंधित बाधित पशुपालक शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणाच्या निकषानुसार या बाधित पशुपालक शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात या आजारामुळे 14853 पशुधन बाधित झाले होते. यापैकी 13578 जनावरे हे औषध उपचारानंतर पूर्णपणे बरी झाली आहेत.

मात्र 910 जनावरांना या आजारापासून वाचवता आले नाही. यामुळे यां मृत्युमुखी पडलेल्या 910 जनावरांसाठी नुकसान भरपाई देणे अपेक्षित आहे. यामध्ये 520 पशुपालकांना एक कोटी 22 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित 389 पशुपालकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. मात्र यासाठी 32 लाखाचा निधी पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित पशुपालक शेतकऱ्यांना देखील लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

Ajay Patil