Agriculture Yojana : देशातील शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, बेरोजगारांच्या, कष्टकरी शेतमजुरांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून कायमच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात. वास्तविक आपला देश कृषीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती व शेतीशी निगडित उद्योग धंद्यांवर आधारित आहे.
अशा परिस्थितीत या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासनाकडून कायमच प्रयत्न केले जातात. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील युवकांना, बेरोजगारांना आणि शेतकऱ्यांना तसेच कष्टकरी शेतमजुरांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना नामक एक कल्याणकारी शेतकरी हिताची योजना सुरू करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- अरे वा! पुण्याच्या प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या 81 झाडातून मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही भन्नाट यशोगाथा
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील नवयुवकांना तसेच शेतकऱ्यांना कृषी स्टार्टअप साठी प्रोत्साहित केले जात आहे. या योजनेअंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याने कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या अॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या व अन्य वैयक्तिक स्वरूपातदेखील एकादा नावीन्यपूर्ण, अभिनव संशोधन करणारा, रोजगारनिर्मिती करणारा कोणत्याही प्रकारचा कृषी स्टार्टअप सुरू केला असेल तर अशा शेतकऱ्यांना पाच लाखांपासून ते 25 लाखांपर्यंतचे अनुदान देण्याचे प्रावधान आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रात 48 कृषी स्टार्टअप साठी पाच कोटी 62 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा ईशारा, पहा तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान?
निश्चितच राज्यातील कृषी स्टार्टअपला यामुळे मोठी मदत मिळाली आहे. या योजनेमुळे राज्यातील कृषी स्टार्टअप करणाऱ्या नवयुवकांना मोठ प्रोत्साहन मिळत आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही. दरम्यान या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी जर कोणी नाविन्यपूर्ण कृषी स्टार्टअप सुरू केला असेल तर त्यांना अर्ज करण्याचे आव्हान राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे (रफ्तार) प्रमुख डॉ. अशोक बारीमुल्ला यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यासाठी 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज मात्र सादर करावा लागणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेऊ नका; कृषी विभागाचा गंभीर इशारा
या चालू आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत कृषी स्टार्टअपहेतू अनुदान मिळवण्यासाठी www.circotrabi.com या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करतांना मात्र 31 मार्चपूर्वी सादर करायचा आहे.
निश्चितच नवयुवक शेतकऱ्यांना कृषी स्टार्टअपसाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक अनुदान देऊन प्रोत्साहन दिले जात असल्याने नजीकच्या काळात राज्यात वेगवेगळे कृषी स्टार्टअप उभारी घेतील अन राज्यात वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी बेरोजगारांना उपलब्ध होतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- कौतुकास्पद ! कांद्याला भाव मिळेना म्हणून पुण्याच्या शेतकऱ्याने केला ‘हा’ प्रयोग; आता लाखोंच्या घरात जातोय कमाईचा आकडा