स्पेशल

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील ‘या’ स्थानकावर रेल्वेचा डब्बा घसरला…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून रेल्वेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. डब्याचे चाक निसटल्याने डब्बा घसरला असल्याची माहिती समजली आहे.

ही दुर्घटना मनमाड- दौंड रेल्वे मार्गावर मनमाड कडून दौंड कडे जाणाऱ्या मालगाडीसोबत घडली आहे. मनमाड- दौंड रेल्वे मार्गावर मनमाड कडून दौंड कडे जाणाऱ्या मालगाडीच्या डब्याचे चाक निसटल्याने डब्बा घसरला आहे.

ही घटना रविवारी (दि. 30) रात्री पावणे अकराच्या सुमारास कान्हेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. सुदैवाने ती मालगाडी असल्याने तसेच ती मालगाडी रिकामी असल्याने मोठी दुर्घटना घडली नाही.

यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीने दुरुस्ती करण्याच्या उपायोजना युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्या होत्या. हा डबा नेमका कशामुळे घसरला या संदर्भात उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये चाकांची सेंटर पिन निसटल्याने ही घटना घडली असल्याची आपापसात दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती.

दरम्यान या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. मनमाडकडून दौंडकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे प्रवासी गाड्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.

रात्री उशिरा ही रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

दुर्घटना नाही
मालगाडीचे डब्बा घसरण्याचा प्रकार रात्री पावणेअकरा वाजता घडला असून ही मालगाडी असल्याने तसेच ती मालगाडी रिकामी असल्याने मोठी दुर्घटना घडली नाही.

जर हीच घटना प्रवासी रेल्वेबाबत घडली असती तर मात्र मोठी दुर्घटना झाली असती. दरम्यान या घटनेमुळे मात्र मनमाडकडून दौंडकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

Ahmednagarlive24 Office