Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता जल हे जीवन आहे. पाण्याविना नवी जीवनाची कल्पना करणे देखील अशक्य आहे. यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एकूण 825 नळ पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे निश्चितच अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, या नळ पाणी योजनेस जवळपास एक हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद जिल्ह्यासाठी करण्यात आली असून एवढा मोठा निधी जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यात असलेला पाण्याचा प्रश्न हा कायमचा निकाली निघण्यास मदत होणार आहे.
साहजिकच अहमदनगर जिल्ह्याला 1300 कोटींचा निधी मिळणार आहे यामुळे योजनेमधील कामे गुणवत्तापूर्ण आणि जलद गतीने होण्यासाठी गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण अशी बैठक पार पडली आहे. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सदर बैठक आयोजित झाली होती.
जल जीवन मिशन योजना 2024 जिल्ह्यात राबविण्याबाबत ही बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित झाली होती. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या सदर बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे, उपविभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, बी आर सी, सी आर सी व सीएससी अभियंता, कंत्राटदार , ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी या बैठकीत उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांनी 2024 पर्यंत जलजीवन मिशन योजना राबवली जाणार असल्याचे नमूद केले. तसेच यासाठी प्रभावीपणे काम करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. निश्चितच, बैठकींचा दौर सुरू झाला असल्याने जिल्ह्यात लवकरच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी योजनेला मूर्त रूप मिळणार असून यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.