Ahmednagar Mango Farming : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान बघायला मिळत आहे. यामुळे उन्हाचे चटके कमी भासत असले तरीदेखील येत्या काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसात उन्हात वाढ होणार असून आता लवकरच बाजारात खवय्ये आंबे शोधण्यास सुरुवात करणार आहेत
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांचा मोठा गाजावाजा असतो. बाजारात वेगवेगळ्या जातींची आंबे उन्हाळ्यात दाखल होतात. यामध्ये कोकणातील हापूस, केशर या जातीचे आंबे विशेष लोकप्रिय आहेत. वास्तविक कोकण हा आंबा उत्पादनासाठी विशेष ओळखला जाणारा विभाग आहे. कोकणातील देवगड या ठिकाणी उत्पादित होणारा हापूस आंबा तर सातासमुद्रापार नावलौकिक मिळवून बसला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या! ‘ही’ कागदपत्रे तयार असतील तरच मिळणार कांदा अनुदानाचे पैसे, पहा….
यासोबतच कोकणातील केशर आंब्याची देखील खवय्यांना भुरळ पडलेली असते. कोकणातील केशर आंबा ज्या पद्धतीने खवय्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे तसाच अहमदनगर मधील टिकल्या आंबा देखील खवय्यांमध्ये तेथील भागात विशेष लोकप्रिय बनला आहे. हा आंबा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या मौजे तिखोल या गावात उत्पादित होतो.
हा आंबा गावरान असून या आंब्याची चव ही विशेष अप्रतिम असल्याचा दावा खवय्यांच्या माध्यमातून केला जातो. या आंब्यामुळे तीखोल गावाला एक वेगळी ओळख प्राप्त झाली असून गेल्या साठ वर्षांपासून या गावात या जातीचा आंबा उत्पादित होत आहे. वास्तविक केल्या काही वर्षांपूर्वी या गावात या जातीच्या आंब्याचे एकच झाड होते. म्हणजेच ही जात जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होती.
त्यामुळे या जातीचे संवर्धन करणे अत्यावश्यक होते. गावरान आंब्याची ही जात नामशेष होऊ नये यामुळे पठारी ठाणगे या प्रयोगशील शेतकऱ्याने या जातीच्या आंब्याचे संवर्धनाचे काम हाती घेतले. यासाठी त्यांनी टिकल्या जातीच्या आंब्यापासून 30 रोपे तयार केली. याची त्यांनी चांगली देखभाल केली आणि या आंब्याची बाग फुलवली. यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या जातीला पुनरुजीवित्त करण्याचे काम या शेतकऱ्याने केले असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
आता पठारी यांचा मुलगा शामकांत हे देखील आपल्या वडिलांचे कार्य पुढे नेत आहेत. त्यांनी देखील या जातीच्या संवर्धनासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. शामकांत यांनी दोन एकरावर या जातीच्या आंब्याची लागवड केली असून सध्या स्थितीला त्यांच्या बागेतील सत्तरहून अधिक आंब्याच्या झाडांना चांगला बहर आला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर; ‘या’ कारणामुळे तुरीचे दर जाणार 9 हजार पार !
ठाणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना वर्षाकाठी या दोन एकरातून तीन ते साडेतीन लाखांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. ते सांगतात की दोन एकर आंबा लागवडीसाठी त्यांना साठ हजाराचा खर्च आला आहे. आंब्याच्या एका झाडापासून त्यांना 200 ते 300 किलो उत्पादन या ठिकाणी मिळत आहे. किलोला दोनशे रुपयाचा दर बाजारात या आंब्याला मिळत असून आपल्या अप्रतिम चवीसाठी बाजारात याला मोठी मागणी आहे.
एकंदरीत ठाणगे यांनी नामशेष होतं चाललेली आंब्याची जात संवर्धित करून यातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. निश्चितच ठाणगे यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार असून अहमदनगरचा टिकल्या आंबा यामुळे वाचवण्यात त्यांना यश आले आहे यात तीळमात्र देखील शँका नाही.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी निघाली; तुमचा नंबर लागला की नाही?, पहा…..