Ahmednagar News : गेल्या दहा वर्षांच्या काळात अहमदनगर सहित संपूर्ण महाराष्ट्रासहित रस्ते विकासाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. नगर शहरातील गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असणारा उड्डाणपुलाचा प्रश्न देखील निकाली काढला गेला आहे. दरम्यान आता शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तीन नवीन उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत.
या तिन्ही उडानपुलांचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कामाचे भूमिपूजन केले. काल तीन ऑगस्ट रोजी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

या तीन नवीन उड्डाणपुलांमुळे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या उड्डाणपुलांचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल असे म्हटले जात आहे.
जर या दीड वर्षांच्या काळात या तिन्ही उड्डाणपूलांचे काम पूर्ण झाले तर नक्कीच शहरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या उड्डाणपुलाचे काम पुढील महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.
यासाठी जवळपास 123 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत आज आपण हे तीन नवीन उड्डाणपूल कुठे विकसित केले जाणार? या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कुठं विकसित होणार उड्डाणपूल
वडगाव गुप्ता चौक ते अरुण हॉटेल ( सह्याद्री चौक) : या पुलाची लांबी 620 मीटर एवढी राहणार आहे. हा एक तीन पदरी उड्डाणपूल असेल. या पुलाचे काम डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
बिर्याणी हाऊस ते चौपाटी कढीवडा (सनफार्मा चौक) : या उड्डाणंपुलाचे अंतर 677 मीटर एवढे राहणार आहे. या पूलाचे काम देखील डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. हा एक तीनपदरी उड्डाणपूल राहणार आहे.
पोलीस अधीक्षक निवासस्थान ते नटराज टॉकीज चौक : या पुलाची लांबी 540 मीटर एवढी राहणार आहे. याचे काम देखील डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे.
किती खर्च करावा लागणार ?
पोलीस अधीक्षक निवासस्थान ते नटराज टॉकीज चौक या पुलासाठी 71 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच उर्वरित दोन पूलांसाठी 52 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.